प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, शेजाऱ्यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसांनी राहत्या फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 17:05 IST2025-06-20T17:05:23+5:302025-06-20T17:05:47+5:30

७ दिवस मृतदेह फ्लॅटमध्येच होता, शेजाऱ्यांनी दुर्गंधीमुळे केली तक्रार

pakistani actress ayesha khan passes away at the age of 77 she was dead 7 days back | प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, शेजाऱ्यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसांनी राहत्या फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह

प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, शेजाऱ्यांच्या तक्रारीनंतर ७ दिवसांनी राहत्या फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह

पाकिस्तानच्या प्रसिद्ध अभिनेत्री आयेशा खान (Ayesha Khan) यांचं निधन झालं आहे. कराची येथील राहत्या घरीच त्यांचा मृतदेह आढळून आला. ७ दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. पोलिसांनीच ही माहिती दिली. आयेशा खान ७७ वर्षांच्या होत्या. त्यांनी अनेक गाजलेल्या पाकिस्तानी मालिकांमध्ये काम केलं होतं. 

अभिनेत्री आयेशा खान कराची येथील गुलशन ए इकबाल अपार्टमेंटमध्ये राहत होत्या. त्यांच्या शेजारील लोकांना फ्लॅटमधून दुर्गंधी येत होती. त्यांनी पोलिसांना सूचना केली. पोलिस फ्लॅटमध्ये आले असता त्यांना आयेशा खान यांचा मृतदेह मिळाला. नंतर फॉरेन्सिक रिपोर्टनुसार त्यांचं ७ दिवसांपूर्वीच निधन झाल्याचं स्पष्ट दिलं. ७ दिवस त्यांचा मृतदेह फ्लॅटमध्येच कुजत होता. वृद्धापकाळानेच त्यांचं निधन झालं. सध्या आयेशा खान यांचं पार्थिव त्याच्या राहत्या घरी ठेवण्यात आलं आहे. त्यांचा मुलगा आल्यानंतर पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

आयेशा घरात एकट्याच राहत होत्या. त्यांची मुलं परदेशात राहतात. आयेशा खान यांनी 'अफशां','उरुसा','आंच','बंधन','शाम से पहले' पाकिस्तानी ड्रामा मध्ये काम केलं आहे. त्या मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय चेहरा होत्या. त्यांची बहीण खालिदा रियासत या देखील अभिनेत्री आहेत. 

Web Title: pakistani actress ayesha khan passes away at the age of 77 she was dead 7 days back