Oscar 2019 : रणवीर सिंग - आलिया भटचा ‘गली बॉय’ ऑस्करच्या स्पर्धेतून बाद 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 10:18 AM2019-12-17T10:18:25+5:302019-12-17T10:27:00+5:30

Oscar 2019 : रणवीर सिंग आणि आलिया भट यांचा ‘गली बॉय’ हा सिनेमा ऑस्करच्या शर्यतीतून बाद झाला आहे.

Oscar 2019 : ranveer singh alia bhatt film gully boy out of oscars race | Oscar 2019 : रणवीर सिंग - आलिया भटचा ‘गली बॉय’ ऑस्करच्या स्पर्धेतून बाद 

Oscar 2019 : रणवीर सिंग - आलिया भटचा ‘गली बॉय’ ऑस्करच्या स्पर्धेतून बाद 

googlenewsNext

रणवीर सिंग आणि आलिया भट यांचा ‘गली बॉय’ हा सिनेमा ऑस्करच्या शर्यतीतून बाद झाला आहे. होय, ऑस्करच्या 92 व्या अ‍ॅकेडमी अवार्डसाठी भारताकडून अधिकृतरित्या ‘गली बॉय’ची निवड करण्यात आली होती. दी अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्सेसने ‘बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म’ या श्रेणीतील टॉप 10 चित्रपटांची यादी जाहीर केली. यात ‘गली बॉय’ स्थान मिळवून शकला नाही. 
उरी-द सर्जिकल स्ट्राईक, केसरी, बधाई हो, आर्टिकल 15, अंधाधून अशा एकूण 27 चित्रपटांमधून ‘गली बॉय’ची निवड करत, भारताने तो ऑस्करसाठी पाठवला होता. यामुळे भारतीय चाहते सुखावले होते. पण आता हा सिनेमा ऑस्करच्या शर्यतीतून बाद झाल्याने चाहत्यांची निराशा झाली आहे. ‘गली बॉय’ हा सिनेमा यावर्षी फेब्रुवारीत रिलीज झाला होता. जोया अख्तरने दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात मुंबईतल्या धारावीमध्ये राहणा-या मुरादच्या संघर्षाची कहाणी आहे. बॉक्सऑफिसवर या चित्रपटाने 140 कोटींचा गल्ला जमवला होता.



 

हे आहेत ऑस्करच्या टॉप 10 यादीतील सिनेमे ( बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म )
द पेन्टेड बंद (चेक रिपब्लिक)
ट्रूथ अ‍ॅण्ड जस्टिस (एस्टोनिया)
लेस मिसरेबल (फ्रान्स)
दोज हू रिमेन्ड (हंगेरी)
हनीलॅण्ड (नॉर्थ मॅसिडोनिया)
कॉर्पस क्रिस्टी (पोलंड)
बिनपोल (रशिया)
एटलान्टिक्स  (सेनेगाल)
पॅरासाईट (साऊथ कोरिया)
पेन अ‍ॅण्ड ग्लोरी (स्पेन) 

Read in English

Web Title: Oscar 2019 : ranveer singh alia bhatt film gully boy out of oscars race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.