OMG! ​संजय दत्तच्या बायोपिकमध्ये दिसणार स्वत: संजय दत्त!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 07:00 AM2018-01-11T07:00:22+5:302018-01-11T12:31:00+5:30

येत्या २९ तारखेला संजय दत्तचे बायोपिक रिलीज होणार आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे. या चित्रपटात रणबीर कपूर संजय दत्तच्या ...

OMG! Sanjay Dutt will appear in Sanjay Dutt's biopic !! | OMG! ​संजय दत्तच्या बायोपिकमध्ये दिसणार स्वत: संजय दत्त!!

OMG! ​संजय दत्तच्या बायोपिकमध्ये दिसणार स्वत: संजय दत्त!!

googlenewsNext
त्या २९ तारखेला संजय दत्तचे बायोपिक रिलीज होणार आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे. या चित्रपटात रणबीर कपूर संजय दत्तच्या भूमिकेत दिसेल, हेही तुम्हाला ठाऊक आहेच. पण आता एक नवी बातमी आहे. होय, संजय दत्तच्या बायोपिकमध्ये स्वत: संजय दत्त हा सुद्धा भूमिका साकारताना दिसणार आहे. होय, खबर एकदम पक्की आहे. रणबीर कपूर स्टारर या चित्रपटाचे सर्व शूटींग संपल्यानंतर यासाठी काही प्रमोशनल व्हिडिओ बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि याच प्रमोशनल व्हिडिओमध्ये संजय दत्त आणि रणबीर कपूर दिसणार आहे. म्हणजे रिअल लाईफ संजूबाबा आणि रिल लाईफ संजूबाबा दोघेही एकत्र येणार आहेत. या व्हिडिओत रणबीर संजूबाबाला त्याच्या आयुष्याशी निगडीत काही प्रश्न विचारताना दिसेल. साहजिकचं या रिअल आणि रिल संजूबाबाची जुगलबंदी बघण्यासाठी आम्ही प्रचंड उत्सूक आहोत. आमच्याइतकेच तुम्हीही ही जुगलबंदी पाहण्यासाठी उत्सूक असाल, असा आम्हाला विश्वास वाटतोय.

तूर्तास या बायोपिकचे नाव अद्याप ठरलेले नाही. मुन्नाभाई, दत्त, बाबा, संजू अशा अनेक नावांची यासाठी चर्चा आहे. या बायोपिकसाठी रणबीरने बरीच मेहनत घेतलीयं. अगदी प्रत्येक सीन परफेक्ट व्हावा, अशी रणबीरची इच्छा होती. त्याचमुळे ऐनवेळी रणबीरने काही सीन्सचे शूटींग पुन्हा करायला लावले. हा एक मोठा चित्रपट आहे, हे रणबीर जाणून आहे आणि कदाचित म्हणून त्याला सगळे काही अगदी परफेक्ट हवे आहे. केले त्यापेक्षाही परफेक्ट त्याला करायचे आहे.  

ALSO READ : मनीष मल्होत्राच्या पार्टीत नशेत संजय दत्तने केला तमाशा, फोटोग्राफर्सला केली शिवीगाळ!

या बायोपिकमध्ये  रणबीर कपूर  तीन वेगवेगळ्या अवतारात दिसणार आहे. एक म्हणजे, संजय दत्तचा बॉलिवूड डेब्यू, मग त्याला लागलेले ड्रग्सचे व्यसन आणि नंतर तुरुंगातील शिक्षा. चित्रपटात संजयचे वडील सुनील दत्त यांच्या भूमिकेत परेश रावल तर आई नर्गिसच्या भूमिकेत अभिनेत्री मनीषा कोईराला दिसणार आहे. याशिवाय सोनम कपूर, अनुष्का शर्मा यांच्याही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 

Web Title: OMG! Sanjay Dutt will appear in Sanjay Dutt's biopic !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.