बोंबला, मालदीव्हजमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते ही अभिनेत्री, मजा मस्ती करताना पडली पाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 07:05 PM2021-08-13T19:05:32+5:302021-08-13T19:08:32+5:30

सनाचा पती मुफ्ती अनस आहे. तो गुजरातचा एक सुप्रसिद्ध व्यापारी आहे. ‘बिग बॉस 14’चा स्पर्धक एजाज खान याने अनस आणि सना यांची पहिली भेट घडवली होती.

OMG Sana Khan while enjoying in Maldives fell in water, Check Her Enjoyment Or Reaction Here | बोंबला, मालदीव्हजमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते ही अभिनेत्री, मजा मस्ती करताना पडली पाण्यात

बोंबला, मालदीव्हजमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते ही अभिनेत्री, मजा मस्ती करताना पडली पाण्यात

googlenewsNext

एकेकाळी आपल्या अभिनयाने रसिकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री सना खानने कायमचाच इंडस्ट्रीला रामराम ठोकत संसारात रमली. अचानक लग्नाचे फोटो शेअर करत तिने चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला होता.  20 नोव्हेंबर 2020 मध्ये अनसशी निकाह करत आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली.

 

सोशल मीडियावरही ती प्रचंड सक्रीय असते. पतीसोबत वेगवेगळ्या स्थळांना भेटी देत व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसते. आता सना मालदीव्हजमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे मालदीव्हजमधली प्रत्येक अपडेट ती चाहत्यांसह शेअर करत आहे.सनाने समुद्र किनाऱ्याजवळील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.


नुकताच तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. स्विमिंग पूलमध्ये ती धमाल करत असल्याचे या व्हिडीओत पाहायला मिळतंय. तितक्यात तिचा तोल जातो आणि ती पाण्यात पडल्याचे पाहायला मिळतंय.तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. सनाच्या चाहत्यांनाही हा मजेदार व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. सोबतच तिने तिचे अनेक सुंदर फोटोंनाही चाहते भरभरून पंसती देत असल्याचे पाहायला मिळतंय.


सनाचा पती मुफ्ती अनस  आहे. तो गुजरातचा एक सुप्रसिद्ध व्यापारी आहे. ‘बिग बॉस 14’चा स्पर्धक एजाज खान याने अनस आणि सना यांची पहिली भेट घडवली होती. त्यानंतर दोघांनी लग्न केल्याचे समोर आले होते. लग्नानंतर सनाने जाहीर केले होते की, आता ती अभियनक्षेत्रात काम करणार नाही. यासाठी एक पोस्टही तिने शेअर केली होती.  ‘सगळ्या बंधू-भगिनींना माझी विनंती आहे की, यापुढे चित्रपट सृष्टीत कुठल्याही कामासाठी मला बोलवण्यात येऊ नये.

आतापर्यंतच्या सहकार्यासाठी खूप खूप आभार’. सनाची ही  पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.तेव्हा पासून सना ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर जात धर्माच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला होता. सना आता सिनेमात दिसतं नसली तरी सोशल मीडियावरून तिच्या खासगी आयुष्याबद्दल चाहत्यांना अपडेट देताना दिसते.

Web Title: OMG Sana Khan while enjoying in Maldives fell in water, Check Her Enjoyment Or Reaction Here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.