OMG ! ​पुन्हा एकदा स्मोकिंग करताना दिसली माहिरा खान!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2018 13:06 IST2018-03-29T07:36:07+5:302018-03-29T13:06:07+5:30

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान एकदा पुन्हा वादात सापडली आहे आणि यावेळी सुद्धा कारण स्मोकिंग हेच आहे. होय, गतवर्षी बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरसोबत माहिरा स्मोकिंग करताना दिसली होती.

OMG! Mahira Khan once again seen smoking! | OMG ! ​पुन्हा एकदा स्मोकिंग करताना दिसली माहिरा खान!!

OMG ! ​पुन्हा एकदा स्मोकिंग करताना दिसली माहिरा खान!!

किस्तानी अभिनेत्री माहिरा खान एकदा पुन्हा वादात सापडली आहे आणि यावेळी सुद्धा कारण स्मोकिंग हेच आहे. होय, गतवर्षी बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरसोबत माहिरा स्मोकिंग करताना दिसली होती. पण आताश: ती एकटीने स्मोकिंग करतेय. स्मोकिंग करतांनाचा तिचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ एका इव्हेंटचा आहे. बॅकस्टेज काही लोकांशी बोलताना माहिरा सिगारेटचे झुरके घेत आहे. माहिराचा हा व्हिडिओ व्हायरल होताच, पाकिस्तानात पुन्हा एकदा तिच्यावर टीका  होतेय. ‘कदाचित माहिरला अ‍ॅडिक्ट झालीय,’ असे एका युजरने लिहिलेयं. तर एकाने माहिरा अशाप्रकारे व्यवनाचे प्रदर्शन करून समाजात चुकीचा संदेश पसरवत आहे, असे लिहिले आहे. अर्थात काहींनी माहिराचा बचावही केला आहे. माहिराच्या स्मोकिंगला जोडून पाकिस्तान बदलत असल्याचे मत अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केले आहे.



अद्याप माहिराने या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे माहिरा यावर काय खुलासा करते, स्वत:चा कसा बचाव करते, ते बघणे इंटरेस्टिंग ठरणार आहे. कारण याआधी स्मोकिंगवर माहिरा बरेच काही बोलली आहे.

ALSO READ : माहिरा खान अद्यापही विसरू शकली नाही तो अपमान!!

गतवर्षी सप्टेंबरमध्ये या फोटोंमध्ये रणबीर कपूर व माहिरा खान दोघेही स्मोकिंग करताना दिसले होते. माहिरा यात एका शॉर्ट  बॅकलेस ड्रेसमध्ये होती. शिवाय तिच्या शरिरावर काही ‘लव्ह बाईट्स’ही कॅमेºयाने टिपले होते.   हे फोटो आणि माहिराच्या पाठीवरचे हे ‘लव्ह बाईट्स’ यानंतर जितका काय तो बोभाटाही झाला होता. पाकिस्तानी जनतेने तर माहिराला जाम फैलावर घेतले होते. ‘शर्म से मर जाओ, पाकिस्तान से दफा हो जाओ. शॉर्ट ड्रेस उपर सिगरेट. तुम जैसी पाकी कलाकार पाकिस्तान को बदनाम करते है,’ अशा प्रतिक्रिया पाकिस्तानात उमटल्या होत्या. 

Web Title: OMG! Mahira Khan once again seen smoking!