मानलेल्या भावाच्या लग्नात नोरा फतेहीला आलं भरून, व्हिडीओ पाहिलात का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 17:33 IST2024-12-30T17:33:31+5:302024-12-30T17:33:43+5:30
लग्न समारंभाचा छोटा व्लॉग तिनं शेअर केलाय. जो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मानलेल्या भावाच्या लग्नात नोरा फतेहीला आलं भरून, व्हिडीओ पाहिलात का?
'दिलबर गर्ल' नोरा फतेही सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. ती तिच्याविषयीचे अपडेट्स चाहत्यांना देते. अशातच नोरा ही तिच्या मानलेल्या भावाच्या लग्नालारत्नागिरीला गेली होती. या लग्नातील काही फोटो आणि व्हिडीओ स्वत: च्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. लग्न समारंभाचा छोटा व्लॉग तिनं शेअर केलाय. जो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
नोरा फतेहीसाठीरत्नागिरीचा अनुप सुर्वे हा गेल्या काही वर्षांपासून काम करतोय. तो तिचा फक्त टीम मेंबर नाही. नोरा त्याला आपला भाऊ मानते. म्हणून खास नोराने आपल्या व्यस्त शेड्युलमधून वेळात-वेळ काढून मुंबई ते रत्नागिरी असा रेल्वेने प्रवास केला आणि त्याच्या लग्नाला पोहचली. विशेष म्हणजे लग्नासाठी ती एकदिवस आधी पोहचली होती. हळद आणि लग्नात तिनं अगदी कोणताही बडेजाव न करता एका सामान्य व्यक्तीप्रमाणे आनंद लुटला.
अनुपच्या हळदीला नोरानं धमाले केली. त्यांच्या कुटुंबासोबत ती अगदी मिसळून गेली होती. तर लग्नात नोरानं फिकट गुलाबी रंगाची साडी नेसली होती. आपल्या मानलेल्या भावाला बोहल्यावर चढलेलं पाहून नोरा भावूक झाल्याचं दिसून आलं. नोरानं नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या. तर अनुप यानेही लग्नात सहभागी झाल्याबद्दल नोराचे आभार मानले आहेत. नोराचा हे व्हिडीओ पाहून तिचे चाहते खूप खुश झाले आहेत. अनेकांनी तिच्या साधेपणाचं कौतुक केलं आहे.