नेहा कक्कर आहे इतक्या कोटींची मालकीण, एका गाण्यासाठी घेते तब्बल इतके लाख!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 12:25 PM2021-06-06T12:25:51+5:302021-06-06T12:28:23+5:30

Neha Kakkar Birthday : नेहा कक्करने आपल्या आवाजाने अक्षरशः वेड लावलं आहे. तिच्या संपत्तीचा आकडा वाचून तुम्हीही थक्क व्हाल.

neha kakkar today celebrated 32 birthday know about her property | नेहा कक्कर आहे इतक्या कोटींची मालकीण, एका गाण्यासाठी घेते तब्बल इतके लाख!!

नेहा कक्कर आहे इतक्या कोटींची मालकीण, एका गाण्यासाठी घेते तब्बल इतके लाख!!

googlenewsNext
ठळक मुद्देनेहा कक्करने आपल्या करिअरची सुरुवात ‘इंडियन आयडल’ या  शोद्वारे केली. या कार्यक्रमाच्या दुस-या सिझनमध्ये ती एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

सध्या सर्वांच्या गळ्यातील ताईत बनलेली बॉलिवूड सिंगर नेहा कक्कर (Neha Kakkar) हिचा आज वाढदिवस. आपल्या आवाजाने अक्षरश: वेड लावणारी नेहाचे आज लाखो-करोडो दिवाने आहेत. अर्थात इथपर्यंत पोहोचणे तिच्यासाठी सोपे नव्हते.
नेहाचा जन्म दिल्लीतील एका पंजाबी कुटुंबात झाला. नेहाचे वडील एका कॉलेजबाहेर समोसे विकायचे. अत्यंत हालाखीच्या परिस्थिती नेहाचे बालपण गेले. वडिलांना हातभार लावण्यासाठी नेहा आणि तिची बहीण सोनू  देवीच्या जागरणामध्ये भजनं गायच्या. यासाठी तिला केवळ 500 रुपये मिळायचे. आज हीच नेहा कक्कर कोट्यवधी रूपयांची मालकीण आहे. होय, तिच्या संपत्तीचा आकडा वाचून तुम्हीही थक्क व्हाल.

caknowledge या वेबसाईटनुसार, नेहाची नेटवर्थ सुमारे 38 कोटी रूपये आहे.  चित्रपटांमध्ये ती एका गाण्यासाठी 10-15 लाख रुपये घेते.  तासाभराच्या शोसाठी ती 20 ते 25 लाख रुपये घेते. चॅरिटीसाठी विविध लाइव्ह कॉन्सर्ट शोमध्येही ती गायन करते. रिअ‍ॅलिटी शो सुद्धा जज करते.

 नेहा कधीकाळी मातेच्या जागरणात गायची. आज ती अलिशान आयुष्य जगते. नेहा मुंबईच्या वर्सोवा येथील 3 बीएचके अपार्टमेंटमध्ये राहते.  हे एक सामान्य अपार्टमेंट नाही, याची किंमत अंदाजे 1.2 कोटी रुपये आहे. याशिवाय अलीकडे तिने ऋषिकेशमध्येही बंगला खरेदी केला आहे. लक्झरी आणि अलिशान गाड्यांमधून फिरणा-या नेहाकडे ऑडी क्यू 7 आहे जीची किंमत 70 लाख ते 1 कोटी रुपये आहे. नेहाकडे एक मर्सिडीज बेंझ जीएलएस 350 देखील आहे. तिची किंमत तब्बल 80 लाख रुपये आहे. तिने स्वत: ला ही कार 2018 मध्ये भेट म्हणून दिली होती.

नेहा कक्करने आपल्या करिअरची सुरुवात ‘इंडियन आयडल’ या  शोद्वारे केली. या कार्यक्रमाच्या दुस-या सिझनमध्ये ती एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. त्यावेळी ती केवळ अकरावीत शिकत होती. या कार्यक्रमाचे तिला विजेतेपद मिळवता आले नसले तरी या कार्यक्रमामुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आज तिने तिच्या मेहनतीने बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण केले असून आँख मारे, माही वे, मिले हो तुम, बदरी की दुल्हनियाँ, मैं तेरा बॉयफ्रेंड, काला चष्मा ही तिची अनेक गाणी प्रचंड गाजली.


 

Web Title: neha kakkar today celebrated 32 birthday know about her property

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.