मुलीचे काही बरेवाईट तर झाले नाही...; विचारानेच घामाघूम झाल्या नीना गुप्ता, लेकीनेच शेअर केला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2020 10:54 IST2020-12-28T10:53:29+5:302020-12-28T10:54:35+5:30

तर ही घटना आहे ख्रिसमसच्या दिवशीची.

masaba shared instagram story about christmas day tha neena gupta thought i had died here is why | मुलीचे काही बरेवाईट तर झाले नाही...; विचारानेच घामाघूम झाल्या नीना गुप्ता, लेकीनेच शेअर केला किस्सा

मुलीचे काही बरेवाईट तर झाले नाही...; विचारानेच घामाघूम झाल्या नीना गुप्ता, लेकीनेच शेअर केला किस्सा

अभिनेत्री नीना गुप्ता यांची एकुलती एक लेक मसाबा गुप्ताची एक इन्स्टाग्राम पोस्ट सध्या जाम चर्चेत आहे. या पोस्टमध्ये मसाबाने तिच्या मृत्यूचा आणि आई नीनाचा उल्लेख केला आहे.
इन्स्टा स्टोरीवर मसाबाने मजेदार किस्सा शेअर केला आहे. तर ही घटना आहे ख्रिसमसच्या दिवशीची.  ख्रिसमसच्या दिवशी काय झाले, नीना गुप्ता लेकीच्या काळजीने अचानक घाबरून गेल्या. त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. कारण काय तर सकाळचे 9.30 वाजले तरी मसाबा झोपेतून उठली नव्हती. इतक्या वेळ मसाबा झोपू शकत नाही, हे माहित असल्याने नीना घाबरल्या आणि त्या लेकीच्या काळजीने त्यांच्या मनात धस्स् झाले.

मसाबाने इन्स्टास्टोरीवर याबद्दल माहिती दिली. तिने लिहिले, ‘नीना गुप्तांकडून गुड मॉर्निंग. त्या मला पाहायला येत आहेत. कारण मी मेले, असे त्यांना वाटले. मी सकाळी 9.30 वाजता उठले. यापूर्वी असे कधीच झाले नाही. म्हणून माझे काही बरेवाईट तर झाले नाही ना, असे तिला वाटले. हे ख्रिसमस आहे?’

मसाबाची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होते आहे. मसाबा व नीना सध्या मुक्तेश्वर हिल्समध्ये आहेत. दोघींनीही तिथेच ख्रिसमस साजरा केला. नेमक्या ख्रिसमसच्या दिवशीच नीना मसाबाच्या काळजीने चिंतीत झाल्यात.  
 मसाबा गुप्ता ही अभिनेत्री नीना गुप्ता आणि माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांची कन्या आहे. नीना आणि विवयन यांचे लग्न झालेले नाही. मसाबाने 2015 मध्ये मधु मंटेनासोबत लग्न केले होते. 2018मध्ये दोघांनी घटस्फोटोसाठी अर्ज केला आणि 2019मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

नीना गुप्तांसाठी होता मोठा धक्का
मधुपासून विभक्त होण्याचा लेक मसाबाचा निर्णय नीना गुप्तांसाठी धक्कादायक होता. एका मुलाखतीत त्या याबद्दल बोलल्या होत्या. ‘एक आई या नात्याने मी मसाबाला समजवण्याचा बराच प्रयत्न केला होता. घाई करू नकोस, विचारपूर्वक निर्णय घे, असे मी तिला सांगितले होते. कारण आम्हाला मधु आवडतो. तो एक चांगला माणूस आहे. पण काहीही तोडगा निघाला नाही. तिने घटस्फोटाचा निर्णय अतिशय विचारपूर्वक घेतला. पण तरीही तिचा निर्णय माझ्यासाठी धक्कादायक होता,’ असे नीना यांनी सांगितले होते.

नीना गुप्ताची लेक मसाबा गुप्ता पुन्हा एकदा पडली प्रेमात, गोव्यात बॉयफ्रेंडसोबत आहे क्वॉरांटाईन

Web Title: masaba shared instagram story about christmas day tha neena gupta thought i had died here is why