अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप, क्रिकेटरसोबत जोडलं गेलं नाव; आता मलायकाची क्रिप्टिक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 09:23 IST2025-04-08T09:22:14+5:302025-04-08T09:23:03+5:30

मलायका अरोरा पुन्हा चर्चेत, यावेळी पोस्ट शेअर करत म्हणते...

malaika arora shared cryptic post on social media says as you get older you get | अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप, क्रिकेटरसोबत जोडलं गेलं नाव; आता मलायकाची क्रिप्टिक पोस्ट

अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप, क्रिकेटरसोबत जोडलं गेलं नाव; आता मलायकाची क्रिप्टिक पोस्ट

अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) अनेक कारणांमुळे सतत चर्चेत असते. अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप आणि आता एका क्रिकेटपटूसोबत अफेअरमुळे ती प्रसिद्धीझोतात आहे. याशिवाय मलायका सोशल मीडियावरही सक्रीय असते. सर्व चर्चांदरम्यान नुकतीच तिने एक क्रिप्टिक पोस्ट केली आहे. यामधून तिने पुन्हा अर्जुन कपूरवरच निशाणा साधला आहे का असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

काय आहे मलायकाची पोस्ट?

मलायकाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात असेल लिहिले आहे की, "जसं जसं तुम्ही मोठे होता तसं तसं तुम्ही भांडणांपेक्षा शांततेची निवड करता. तसंच अनादर होण्यापेक्षा अंतर ठेवणं पसंत करता. नाटकं तुम्हाला सहन होत नाहीत आणि तुमच्या मनाची शांतता तुमच्यासाठी पहिलं प्राधान्य बनून जातं. तुमच्या मानसिक आरोग्यासाठी, स्वच्छ मनाच्या लोकांमध्येच तुम्ही राहायला सुरुवात करता."

मलायकाची ही पोस्ट वाचून तिने हे नक्की कोणाला संबोधून शेअर केलं आहे याचा अंदाज येतो. तसंच सततच्या लाईमलाईटपासून दूर तिने शांततेला प्राधान्य द्यायचं ठरवलं आहे.  गेल्या वर्षीच तिचं अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झालं. 

क्रिकेटपटू संगकारासोबत जोडलं गेलं नाव

नुकतीच मलायका आयपीएल सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होती. मलायका क्वचितच मॅच पाहण्यासाठी आलेली दिसते. यावेळी तिच्या बाजूला क्रिकेटपटू कुमार संगकाराही होता. त्यामुळे दोघांच्या अफेअरची चर्चा तिथूनच सुरु झाली.

Web Title: malaika arora shared cryptic post on social media says as you get older you get

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.