Exclusive ताºयांनाही भुरळ लकीचार्म्सची

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2016 13:37 IST2016-07-11T08:07:33+5:302016-07-11T13:37:33+5:30

 प्रियांका लोंढे                                    बॉलीवुडमधील ...

Luckyarchs love the exclusive talents | Exclusive ताºयांनाही भुरळ लकीचार्म्सची

Exclusive ताºयांनाही भुरळ लकीचार्म्सची

 प्रियांका लोंढे

                   
   

            बॉलीवुडमधील अनेक असे कलाकार आहेत ज्यांचा लकीचार्मवर विश्वास आहे. आपल्या यशासाठी किंवा आयुष्यात येणाºया सकारात्मक वाईब्ससाठी हे स्टार्स त्यांच्याजवळ काही गोष्टी बाळगतात. अशाच काही कलाकारांचा सीएनएक्सने घेतलेला हा आढावा. 
 

 सलमान खान : बॉलीवुडचा दबंग खान सलमान आज फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वत:चे अस्तित्व निर्माण करुन आहे. त्याच्या या यशाचे गमक काही असले तरी त्याच्या हातातील निळ््या रंगाच्या ब्रेसलेट कडे लक्ष वेधल्याशिवाय राहत नाही. सलमानच्या हाता फिरोजा नावाचे ब्रेसलेच नेहमी असते. हे ब्रेसलेट त्याला त्याच्या वडिलांनी गिफ्ट केले असल्याने तो नेहमी ते हातात घालतो. तसेच फीरोजा हा खडा यश मिळण्यासाठी देखील घातला जातो. आता सल्लुभाईच्या यशाकडे पाहता त्याला याचा नक्कीच फायदा झाला असे म्हणायला काहीच हरकत नाही.

                
 
 शिल्पा शेट्टी : बºयाच जणांना माहित नसेल की शिल्पा शेट्टी तिच्या करंगळीमध्ये ऐक इमरॅल्ड रिंग घालते. ही रिंग नेहमीच तिच्या बोटात तुम्हाला पहायला मिळेल. शिल्पाची लकी चार्म रिंग असुन आयपीएलच्या तिच्या टिमच्या मॅचेसवेळी शिल्पा दोन्ही हातात घड्याळे घालते. शिल्पाने ही रिंग घातल्यापासुन तिचे तारे चमकले असल्याचे देखील बोलले जात आहे. 

               

    अमिताभ बच्चन : बॉलीवुडचे सुपरस्टार दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांची देखील लकी चाम्रवर विश्वास आहे. त्यांच्या हातात तुम्हाला एक घड्याळ नेहमी दिसेल अन ते वॉच अमितजींना त्यांच्या वडिलांनी गिफ्ट केले आहे. एवढेच नाही तर अमिताभजींच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाच एक निळ््या खड्याची ब्लु सॅफिअर रिंग तुम्हाला दिसेल. असे म्हणतात की अमितजींच्या पडत्या काळात त्यांनी ही रिंग घातली होती. कुलीच्या वेळी झालेल्या अपघातानंतर अमितीजींनी एकदमच दमदार कमबॅक केला होता त्यावेळी ही रिंग त्यांच्या बोटात होती.

               

 बिपाशा बासु : बॉलीवुडची बोल्ड अ‍ॅन्ड ब्युटिफुल अभिनेत्री बिपाशा बासुचे तर जगभरात चाहते असतील. पण आपली ही सुंदरा प्रेमात आहे लिंबु मिरचीच्या. हे ऐकुन तुम्हाला थोडे विचित्र वाटेलही, पण हेच खरे आहे. बिपाशाचा लिंबु-मिरचीवर विश्वास आहे. बिपाशाच्या कारमध्ये नेहमीच तुम्हाला लिंबु-मिरची लटकविलेली दिसेल. याविषयी बिपाशा सांगते की, मी दर शनिवारी लिंबु-मिरची विकत घेते अन कारमध्ये लटकवते. लिंबु-मिरची आपल्याला वाईट शक्तींपासुन बचावते असे बिपाशाचे म्हणने आहे.

              

 रणबीर कपुर : हॅन्डसम हंक रणबीर कपुरच्या तर लाखो तरुणी दिवान्या आहेत पण आपला हा पठ्ठ दिवाना आहे त्याची आई नीतू कपुरचा. होय, रणबीरची आई नीतू कपुर ही त्याची लकीचार्म असल्याचे तो सांगतो. तसेच  रणबीरसाठी आठ हा आकडा लकी असल्याचे तो मानतो. रणबीरच्या गाडीचा नंबर देखील आठ हा अंक आहे. 

            

cnxoldfiles/strong> उ लाला.. उ लाला ... म्हणणारी विद्या बालन आज बॉलीवुडमध्ये टॉपची अभिनेत्री आहे. तिची मेहनत अन अभिनय या गोष्टी तर तीच्या सक्सेससाठी कारणीभुत आहेतच परंतू विद्याचे लकीचार्म देखील तीतकेच महत्वाचे आहेत. विद्याच्या हातात तुम्ही काळ््या रंगाचे मोठ्या मण्यांचे ब्रेसलेट पहाल. हे ब्रेसलेट नेहमीच तिच्या हातात असते. तर पाकीस्तानमधील हाश्मी काजल नेहमीच तिने घातलेले असते. या दोन गोष्टी तिच्यासाठी लकी असल्याचे ती सांगते.

Web Title: Luckyarchs love the exclusive talents