​पाहा, शाहरूख खान व गौरी खानचे candid-moments !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 11:01 IST2017-09-27T05:31:38+5:302017-09-27T11:01:38+5:30

बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान आणि त्याची बेटरहाफ गौरी खान म्हणजे बॉलिवूडचे एक हटके कपल. या दोघांचे तितकेच हटके फोटो ...

Look, Shah Rukh Khan and Gauri Khan's candid-moments !! | ​पाहा, शाहरूख खान व गौरी खानचे candid-moments !!

​पाहा, शाहरूख खान व गौरी खानचे candid-moments !!

लिवूडचा किंगखान शाहरूख खान आणि त्याची बेटरहाफ गौरी खान म्हणजे बॉलिवूडचे एक हटके कपल. या दोघांचे तितकेच हटके फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे फोटो आहेत ‘वोग वूमन आॅफ द ईअर अवार्डस’ सोहळ्याचे. या सोहळ्याला शाहरूख खान, ऐश्वर्या रायसह अनेक बडे सुपरस्टार्स पोहोचले. पण शाहरूख व त्याची पत्नी गौरी खान या दोघांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 





​अवार्ड शोमध्ये हे कपल फार कमी वेळा एकत्र दिसते. पण जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा अक्षरश: जादू करतात. करड्या रंगाची साडी, त्यावर स्टाईलिश ब्लाऊज,मोकळे केस अशा अंदाजात गौरी या सोहळ्याला पोहोचली. तर शाहरूख निळा कोट आणि निळा टाऊझर अशा त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये दिसला. दोघेही चांगलेच रोमॅन्टिक मूडमध्ये दिसले.यावेळी गौरीने करण जोहरसोबत पोझ दिली तर शाहरूख  ऐश्वर्या रायसोबत पोझ देताना दिसला.





ALSO READ : कामवाल्या बाईने शाहरूख खानकडे केली गौरी खानची खळबळजनक तक्रार!!

गौरी १४ वर्षांची आणि शाहरूख उणापुरा १९ वर्षांचा असताना त्यांची प्रथम नजरानजर झाली. शाहरूखने गौरीला पाहिले आणि पहिल्याच नजरेत तो तिच्या प्रेमात पडला. मग गौरी हीच जणू शाहरूखचा ध्यास बनली. त्याने गौरीसमोर स्वत:चे प्रेम व्यक्त केले. सुरुवातीला  गौरी नकार देत राहिली. पण शाहरूखचे खरे प्रेम पाहून ती त्याच्यापासून फार काळ दूर राहू शकलीच नाही आणि मग सुरु झाली एक प्रेम कहाणी.
शाहरूख गौरीबद्दल अतिशय पजेसिव्ह होता. इतका की, तिने स्वीमसूट घातलेला वा केस मोकळे सोडलेले शाहरूखला चालायचे नाही. तो या मुद्यावरून तिच्यासोबत भांडायला उठायचा. खुद्द शाहरूखनेच एका ठिकाणी ही कबुली दिली होती. ती केस मोकळे सोडायची तेव्हा अप्रतिम दिसयाची. तिला अन्य कुणी पाहावे, हेच मला खपेना. माझ्या आत असुरक्षिततेची भावना होती. कारण आम्ही फार भेटू शकत नव्हतो. आमच्या भेटी-गाठी फार क्वचित होत. त्यामुळे तिच्याबद्दल मी खूप पजेसिव्ह झालो होतो, असे शाहरूखने सांगितले होते.

Web Title: Look, Shah Rukh Khan and Gauri Khan's candid-moments !!