Koffee With Karan 7 : कतरिना व माझं फक्त ‘या’ एकाच गोष्टीवरून भांडण होतं..., खुद्द विकी कौशलने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 16:32 IST2022-08-18T16:30:02+5:302022-08-18T16:32:21+5:30
Koffee With Karan 7 : कतरिना तशी खूप प्रेमळ आहे. पण माझं तिच्यासोबत एकाच गोष्टीवरून भांडण होतं, असं विकी कौशल म्हणाला. ही एक गोष्ट कोणती, याचा खुलासाही विकीने केला...

Koffee With Karan 7 : कतरिना व माझं फक्त ‘या’ एकाच गोष्टीवरून भांडण होतं..., खुद्द विकी कौशलने केला खुलासा
विकी कौशल (Vicky Kaushal ) व कतरिना कैफ ( Katrina Kaif ) यांची लव्हस्टोरी सुरू झाली तीच मुळी करण जोहरमुळे. होय, 2018 साली विकी करणच्या ‘कॉफी विद करण’ या शोमध्ये आला होता. यावेळी तुझी आणि कतरिनाची जोडी सुंदर दिसेल, असं करण म्हणाला म्हणाला. हे ऐकून विकी हातभर उडाला होता. पुढे विकी कतरिनात असा काही गुंतला की सांगायलाच नको. आता दोघंही आपल्या संसारात आनंदी आहेत. लग्नानंतर विकी पुन्हा एकदा करणच्या ‘कॉफी विद करण 7’ (Koffee With Karan 7) या शोमध्ये आला आणि बायकोचं कौतुक करत सुटला. कतरिना खूपच प्रेम आहे. ती नेहमी खरं बोलते, आपल्या भूमिकेवर ठाम असते. तिच्याकडून मला खूप काही शिकायला मिळतं, असं काय काय विकी बोलला. अगदी तिच्यासारखी बायको मिळाली म्हणून मी स्वत:ला नशीबवान मानतो, असं काय काय तो बोलला. पण सगळं गुडी-गुडी कसं असणार? घर म्हटलं की भांड्याला भांड लागणारच... तर याच शोमध्ये विकीने लग्नानंतरच्या भांडणाचा खुलासाही केला.
The way vicky talks about katrina with so much respect is just really heart warming🥰
— Tee 🌬 (@Itsmetee7) August 17, 2022
I agree with sid, its absolutely lovely.#VickyKaushal#katrinakaif#vickatpic.twitter.com/4BEOAJNSh4
माझं तिच्यासोबत एकाच गोष्टीवरून भांडण होतं...
होय, कतरिना तशी खूप प्रेमळ आहे. पण माझं तिच्यासोबत एकाच गोष्टीवरून भांडण होतं, असं तो म्हणाला. ही एक गोष्ट कोणती, याचा खुलासाही विकीने केला. तो म्हणाला, माझं एकाच कारणामुळे तिच्याशी वाजतं, ते म्हणजे क्लोजेट स्पेस. लग्न झाल्यानंतर मला जागा अपुरी पडू लागली आहे. कतरिनाने वन अॅण्ड हाफ रूमवर कब्जा केला आहे. मला फक्त एक कबर्ड आहे, त्याचा सुद्धा लवकरच ड्रॉवर होईल.
विकीच्या या म्हणण्यावर करणने सुद्धा सहमती दर्शवतो. हो, मी तुझ्या घरी हे सगळं पाहिलं आहे, असं तो म्हणाला.
Vicky’s rapid-fire part 1#VickyKaushal#KoffeeWithKaranS7pic.twitter.com/9RfMU8WJoO
— Tee 🌬 (@Itsmetee7) August 17, 2022
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विकी कौशल आणि कतरिना कैफने धूमधडाक्यात लग्न झालं होतं. दोघांच्या लग्नाचे फोटो आजही सोशल मीडियावर सर्च केले जातात. वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तरलवकरच कतरिना सलमान खानसोबत ‘टायगर 3’मध्ये दिसणार आहे. तिचा ‘फोन भूत’ हा सिनेमा देखील 4 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. तर विकी कौशल गोविंदा नाम मेरा, द इम्मॉर्टल अश्वत्थामा यांसारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.