किस बाई किस..!, दिग्दर्शक 'कट' बोलला, तरीदेखील नरगिस फाखरी थांबली नाही, करत राहिली किस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 01:00 PM2021-12-22T13:00:08+5:302021-12-22T13:00:50+5:30

नगगिस फाखरी(Nargis Fakhri)चा हा किस्सा 'अजहर' (Azhar Movie) चित्रपटादरम्यान घडला होता.

Kiss Bai Kiss ..!, The director said 'cut', yet Nargis Fakhri did not stop, kept on kissing | किस बाई किस..!, दिग्दर्शक 'कट' बोलला, तरीदेखील नरगिस फाखरी थांबली नाही, करत राहिली किस

किस बाई किस..!, दिग्दर्शक 'कट' बोलला, तरीदेखील नरगिस फाखरी थांबली नाही, करत राहिली किस

googlenewsNext

बॉलिवूडचा सीरिअल किसर इमरान हाश्मी (Emraan Hashmi)ने रुपेरी पडद्यावर बऱ्याच अभिनेत्रींसोबत रोमँटिक सीन्स दिले आहेत. मात्र एकदा त्याच्यासोबत असे काही झाले की किसिंग सीनदरम्यान तो कावराबावरा झाला होता. हे 'अजहर' (Azhar Movie) चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडले. 'अजहर' चित्रपटात इमरान हाश्मीसोबत अभिनेत्री नरगिस फाखरी (Nargis Fakhri)मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शक कट बोलल्यानंतरही नरगिस इमरान किस करताना थांबली नाही. त्यानंतर सर्वजण अवाक् झाले होते.

हा किस्सा आहे २०१६ सालचा. जेव्हा इमरान हाश्मी आणि नरगिस फाखरीचा 'अजहर' हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटातील बोल दो ना जरा गाण्याचे शूटिंग करत होते. या गाण्याच्या मेकिंगचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात इमरान आणि नरगिस किसिंग सीनबद्दल बोलताना दिसत आहे. या व्हिडीओत नरगिस म्हणते की, मला इमरानला पाच वेळा किस करावे लागले आणि मी त्यासाठी एक्स्ट्रा चार्ज देणार होते. कारण मला असे वाटू लागले होते की, हे तर माझ्या करारात नव्हते. ती पुढे म्हणाली की, मला माहित आहे की, इमरान यामुळे खूप खूश होते. मात्र इमरान यांनी असा अभिनय केला की, हे देवा मला खरंच माहित नव्हते की हे काय चाललं आहे. तो खरंच खोटारडा आहे आणि त्याला हे आवडते.


मेकिंगच्या व्हिडिओत इमरान आणि नरगिसचा एक किसिंग सीक्वेन्स पाहायला मिळत आहे. दिग्दर्शक कट बोलला तरीदेखील नरगिस, इमरानला घट्ट पकडते आणि किस करत राहते. त्यामुळे इमरान काही क्षणांसाठी चकीत होऊन जातो. तर सेटवरील क्रू मेंबर्संना हसू आवरले नाही.

माजी क्रिकेटरचा होता बायोपिक

'अजहर' चित्रपट माजी क्रिकेटर मोहम्मद अजरुद्दीनचा बायोपिक होता. यात इमरान हाश्मीने मोहम्मद अजहरुद्दीनची भूमिका साकारली होती. तर नरगिस फाखरी संगीता बिजलानीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन टोनी डिसूझा- अँथनी डिसूझाने केले होते. या चित्रपटात प्राची देसाईदेखील होती.

Web Title: Kiss Bai Kiss ..!, The director said 'cut', yet Nargis Fakhri did not stop, kept on kissing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.