प्रतिक्षा संपली! 'या' दिवशी रिलीज होणार कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 3', चाहत्याची आतुरता शिगेला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 03:12 PM2023-12-05T15:12:57+5:302023-12-05T15:15:07+5:30

'भूलभुलैया 3'  या सिनेमाविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

Karthik Aaryan's 'Bhool Bhulaiya 3' released update | प्रतिक्षा संपली! 'या' दिवशी रिलीज होणार कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 3', चाहत्याची आतुरता शिगेला

प्रतिक्षा संपली! 'या' दिवशी रिलीज होणार कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 3', चाहत्याची आतुरता शिगेला

अभिनेता कार्तिक आर्यनचा 2022 मध्ये प्रदर्शित  झालेला 'भूल भुलैया 2' हा वर्षातील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटाने अनेक प्रेक्षकांची मने जिंकली. आता 'भूलभुलैया 3'  या सिनेमाविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. 'भूलभुलैया 3' बद्दल मोठे अपडेट आले आहे.

निर्मात्यांनी मार्चमध्ये त्याचा सिक्वेल जाहीर केला होता. आता बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाचा तिसरा भाग दिवाळी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. 'भूल भुलैया 2' हा 2007 मध्ये रिलीज झालेल्या अक्षय कुमार स्टारर 'भूल भुलैया'चा हा सिक्वेल होता. 'भूल भुलैया 2' मध्ये कार्तिकने रूह बाबाची भूमिका साकारली होती, तर तब्बू दुहेरी भूमिकेत होती.

कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, तो 'चंदू चॅम्पियन' चित्रपटात पाहायला मिळणार आहे.  कबीर खान या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. कार्तिक आर्यनचा 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. मुरलीकांत पेटकर हे सुवर्णपदक विजेते असून त्यांनी 1972 मध्ये जर्मनी येथे झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकले होते. मीडिया रिपोर्टनुसार हा चित्रपट 14 जून 2024 पर्यंत रिलीज होऊ शकतो.  
 

Web Title: Karthik Aaryan's 'Bhool Bhulaiya 3' released update

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.