सारा अली खानसाठी मुंबईतच उभारले ‘केदारनाथ’, कोट्यवधी रुपयांचा केला खर्च!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 21:27 IST2017-12-05T15:57:56+5:302017-12-05T21:27:56+5:30

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खानच्या आगामी ‘केदारनाथ’ या चित्रपटाच्या पहिल्या टप्प्यातील शूटिंग पूर्ण झाले असून, लवकरच ...

For Kareena Nath, built in Mumbai for Sara Ali Khan, cost of crores of rupees! | सारा अली खानसाठी मुंबईतच उभारले ‘केदारनाथ’, कोट्यवधी रुपयांचा केला खर्च!

सारा अली खानसाठी मुंबईतच उभारले ‘केदारनाथ’, कोट्यवधी रुपयांचा केला खर्च!

िनेता सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खानच्या आगामी ‘केदारनाथ’ या चित्रपटाच्या पहिल्या टप्प्यातील शूटिंग पूर्ण झाले असून, लवकरच दुसºया टप्प्यातील शूटिंगला सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरू असून, मुंबईतच याकरिता एक भव्य सेट उभारण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील सर्व शूटिंग हिमालयाच्या पर्वतरागांमध्ये करण्यात आली आहे. आता निर्मात्यांनी दुसºया टप्प्यातील शूटिंग मुंबईमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता मुंबईमध्येच हुबेहूब केदारनाथ मंदिर आणि हिमालय असलेले भव्य सेट मुंबईतील फिल्म सिटी येथे उभारण्यात आले आहेत. हे सेट एवढे हुबेहूब आहे की, प्रेक्षकांना हे खरे केदारनाथ मंदिर आहे, असा भास झाल्याशिवाय राहणार नाही. 

हा चित्रपट उत्तराखंडमध्ये आलेल्या पूरपरिस्थितीवर आधारित आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची रिस्क न घेता सेटवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. याच ठिकाणी पूरपरिस्थितीचे चित्रण केले जाणार असल्याने शेकडो टॅँकर पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. आता तुम्ही म्हणाल की, एवढी सर्व व्यवस्था करण्यासाठी साधारणत: किती खर्च आला असेल? तर हा खर्च लाखात नसून कोटीत आहे. होय, हा सेट उभारण्यासाठी तब्बल सात कोटी रुपयांचा खर्च करावा लागला. 

काही दिवसांपूर्वीच निर्मात्या प्रेरणा अरोरा आणि अभिषेक कपूर यांनी सारा आणि सुशांतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. हा फोटो बघून हे दोन्ही स्टार या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत, हे स्पष्ट होते. सारा आणि सुशांतला तर याविषयी ट्रेनिंग दिले जात आहे, जेणेकरून शूटिंग करताना त्यांना कुठलीही दुखापत होऊ नये. दरम्यान, चित्रपटात बरेचसे कठीण दृश्य चित्रित केले जाणार आहे. पुराचे दृश्य असल्याने साहजिकच बºयाचशा लोकांबरोबर सुशांत आणि साराला पुराच्या पाण्यात पोहावे लागणार आहे. त्यामुळे निर्माते कुठलाही अपघात न होऊ देता चित्रपटाची शूटिंग पूर्ण करण्याचा विचार करीत आहेत. 

Web Title: For Kareena Nath, built in Mumbai for Sara Ali Khan, cost of crores of rupees!