आरामात 65-70 कोटींची ओपनिंग केली असती पण..; 'गदर 2' वर कंगनाची रिअॅक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 13:24 IST2023-08-15T13:23:36+5:302023-08-15T13:24:07+5:30
kangana ranaut: 'गदर 2' ला मिळत असलेल्या प्रतिसादाविषयी तिने भाष्य केलं आहे.

आरामात 65-70 कोटींची ओपनिंग केली असती पण..; 'गदर 2' वर कंगनाची रिअॅक्शन
स्पष्टवक्तेपणामुळे कायम चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत (kangana ranaut). कलाविश्वात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर कंगना बेधडकपणे व्यक्त होत असते. यावेळी तिने सनी देओलच्या 'गदर 2' सिनेमावर भाष्य केलं आहे. कंगनाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये या चित्रपटगृहाबाहेरील एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करत तिने सिनेमाला मिळत असलेल्या प्रतिसादाविषयी भाष्य केलं आहे. ज्यामुळे नेटकऱ्यांच्या नजरा तिच्याकडे वेधल्या आहेत.
कंगनाने शेअर केलेला व्हिडीओ गदर 2 च्या स्क्रिनिंगच्या वेळचा आहे. या व्हिडीओमध्ये सनी देओलसोबतअमिषा पटेलदेखील दिसून येत आहे. हा व्हिडीओ शेअर करत कंगना म्हणते, ''जर या सिनेमासोबत अक्षय कुमारचा OMG 2 रिलीज झाला नसता तर,हा सिनेमा आरामात 65-70 कोटींची ओपनिंग करु शकला असता'', असं कंगना म्हणाली.
पुढे ती म्हणते, "हॉलिडे विसरुन जा पण हा सिनेमा एकटाच रिलीज झाला असता तर त्याने आरामात 65-70 कोटींची ओपनिंग केली असती. लोकांवर जरा नजर टाका. या सिनेमामुळे लोकांच्या आयुष्यात देशभक्ती आणि उत्साह पुन्हा आला आहे. सनी देओल आणि तारासिंह सलामत रहें." दरम्यान, कंगनापूर्वी सलमान खानने या सिनेमाचं कौतुक केलं होतं. ढाई किलो का हात-चालीस करोड की ओपनिंग असं त्याने म्हटलं होतं. गदर 2 सोबत OMG 2 हा सिनेमा रिलीज झाला आहे.