जरीन खान झाली 'फेमस'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 12:27 IST2016-01-16T01:08:01+5:302016-02-10T12:27:05+5:30

अभिनेत्री जरीन खान बॉलीवूड इंडस्ट्रीत गेल्या पाच वर्षांपासून असून तिला आता वाटतेय की, ती फेमस झाली आहे. नुकत्याच रिलीज ...

Jairan Khan turns 'Famous' | जरीन खान झाली 'फेमस'

जरीन खान झाली 'फेमस'

िनेत्री जरीन खान बॉलीवूड इंडस्ट्रीत गेल्या पाच वर्षांपासून असून तिला आता वाटतेय की, ती फेमस झाली आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या 'हेट स्टोरी ३' चित्रपटामुळे तिला खुप प्रसिद्धी मिळाली. ती म्हणते,' सर्वांनी चित्रपट पाहिला आणि चित्रपटाविषयी मते देखील व्यक्त केली.

पण मला आता असे वाटतेय की, मी इंडस्ट्रीत फेमस झालेय. ' तिने २0१0 मध्ये सलमान खान सोबत 'वीर' चित्रपटात काम केले आहे. त्यानंतर तिने 'हाऊसफुल्ल २' मध्येही तिचा अभिनय दाखवला. लोकांकडून मिळणार्‍या प्रतिसादावर ती म्हणाली,' हेट स्टोरी ३ नंतर आता मला माझे चाहते बोलवून माझ्या अभिनयाचे कौतुक करतात. आता कुठे मला सेलिब्रिटी झाल्यासारखे वाटत आहे. माझा प्रवास कसा झाला, मला कधीच वाटले नव्हते की मी अभिनेत्री होईन. पण आता खुपच बरे वाटते आहे.'

Web Title: Jairan Khan turns 'Famous'