नवरदेवाला ड्रेसिंगसेन्स शिकवा ! लग्नात बनियन घालून आल्यामुळे आमिरचा जावई होतोय ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 11:00 AM2024-01-04T11:00:15+5:302024-01-04T11:00:54+5:30

Nupur shikhare: या लग्नसोहळ्यासाठी नुपूर आणि आयरा खान या दोघांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला. मात्र, त्यांचे लग्नातील कपडे पाहून नेटकऱ्यांनी त्यांना चांगलंच ट्रोल केलं.

ira-khan-nupur-shikhare-wedding-nupur-shikhare-dance-on-dhol-in-wedding | नवरदेवाला ड्रेसिंगसेन्स शिकवा ! लग्नात बनियन घालून आल्यामुळे आमिरचा जावई होतोय ट्रोल

नवरदेवाला ड्रेसिंगसेन्स शिकवा ! लग्नात बनियन घालून आल्यामुळे आमिरचा जावई होतोय ट्रोल

बॉलिवूड अभिनेता आमिर खान (aamir khan) याची लेक आयरा खान (ira khan) नुकतीच शिखरे कुटुंबाची सून झाली आहे. ३ जानेवारी रोजी मोठ्या थाटामाटात आयराने प्रियकर नुपूर शिखरे (nupur shikhare) यांच्यासोबत लग्नगाठ बांधली.  रजिस्टर पद्धतीने नुपूर आणि आयराने लग्न केलं. विशेष म्हणजे हे लग्न अनेक कारणांसाठी चर्चेत राहिले. त्यातलंच एक कारण म्हणजे या लग्नसोहळ्यात नुपूरने परिधान केलेले कपडे. स्वत:च्याच लग्नात नुपूरने चक्क हाफ पँट आणि बनियन परिधान केल्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला चांगलंच ट्रोल केलं आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटींचा लग्नसोहळा म्हणजे मोठा उत्सव असतो. या लग्नसोहळ्यांमध्ये ही कलाकार मंडळी पाण्यासारखा पैसा खर्च करतात. इतकंच नाही तर त्यांच्या लग्नातील थाटमाट, त्यांचे भरजरी महागडे कपडे हे सारं काही चर्चेत येतं. परंतु, आमिरचा जावई स्वत:च्याच लग्नात चक्क बनियन घालून आला. तर, आयरा मात्र छानपैकी नववधूप्रमाणे नटूनथटून आली होती. त्यामुळे नुपूरला अनेकांनी ट्रोल केलं आहे.

या लग्नात आयराने धोती चोली परिधान केली होती. तर नुपूर शॉर्ट्सवर होता. विशेष म्हणजे नुपूर त्याच्या लग्नाच्या वरातीमध्येही याच कपड्यांमध्ये होता हे पाहून लोकांनी त्याची खिल्ली उडवली आहे.

 

काय म्हणाले नेटकरी?

‘हा जगातील पहिला वर आहे, जो स्वतःच्या लग्नात अशा स्टाईलमध्ये पोहोचला आहे.’ तर,‘हे लग्न कमी आणि स्पोर्ट्स डे जास्त वाटतोय, ’ असं एकाने म्हटलं आहे. 'चड्डी-बनियन गँग', 'लग्नात आलेले पाहुणे म्हणत असतील आम्ही उगाच एवढे पैसे खर्च करुन सजूनधजून आलो', 'नवऱ्याचा ड्रेसिंग सेन्स अजिबातच चांगला नाही', 'नवऱ्याने असे कपडे का घातलेत? त्याच्यासाठी हा सगळ्यात खास दिवस आहे. पण, हा रोजच्या सारखा का कपडे घालून आलाय?', 'मला कोणीतरी सांगा याने शेरवानी सोडून हे असले कपडे का घातलेत?',  'कोणी तरी नवरदेवाला ड्रेसिंग सेन्स शिकवा', अशा कितीतरी कमेंट करत लोकांनी त्याला ट्रोल केलं आहे.

Web Title: ira-khan-nupur-shikhare-wedding-nupur-shikhare-dance-on-dhol-in-wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.