'मिलिंद सोमणला मी नग्नावस्थेत बघितलंय'; वादग्रस्त फोटोमागची कहाणी आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 12:20 PM2022-01-13T12:20:22+5:302022-01-13T12:20:58+5:30

मिलिंद सोमण (Milind Soman) आणि मधू सप्रे (Madhu Sapre)ची ही जाहिरात त्या काळी वादात सापडली होती

'I saw Milind Soman naked'; The story behind the controversial photo came to the fore | 'मिलिंद सोमणला मी नग्नावस्थेत बघितलंय'; वादग्रस्त फोटोमागची कहाणी आली समोर

'मिलिंद सोमणला मी नग्नावस्थेत बघितलंय'; वादग्रस्त फोटोमागची कहाणी आली समोर

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता आणि सुपर मॉडेल मिलिंद सोमण (Milind Soman) त्याच्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत येत असतो. मिलिंद सोमण सोशल मीडियावर सक्रीय असून तो फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. बऱ्याचदा त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. मात्र, यावेळी तो त्याच्या एका जुन्या जाहिरातीमुळे चर्चेत आला आहे. ही जाहिरात वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. ही जाहिरात होती टफ शू या शूजच्या ब्रॅंडची. या जाहिरातीत मिलिंद सोमणसोबत मधु सप्रे (Madhu Sapre) दिसली होती.

१९९५ मध्ये ही जाहिरात बनली होती आणि त्यावेळी मिलिंद सोमण आणि मधू सप्रे हे लोकप्रिय मॉडेल होते. इतकेच नाही तर त्यावेळी ते रिलेशनशिपमध्ये असल्याचे देखील म्हटले जात होते. त्यामुळे त्या दोघांना एकत्र या जाहिरातीत काम करणे सोप्पे झाले असेल अशी चर्चा होती. त्यानंतर त्या दोघांना या जाहिरातीत घेण्यात आलं आणि त्यांनी हे नग्नावस्थेत फोटोशूट केले होते. मिलिंद आणि मधु नग्नावस्थेत असून ते एकमेकांना मिठी मारत असल्याचे या फोटोशूटमध्ये दिसत आहे. तर एक अजगर त्यांच्याभोवती आहे. टफ शूज ही एकमेव अशी गोष्ट होती जी त्या दोघांनी या जाहिरातीत परिधान केले होते. यावरून ही जाहिरात वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.

'...त्यावेळी खूप दडपण आले होते'

मिलिंद आणि मधूच्या नग्नावस्थेत फोटोशूट विषयी सगळे ठरवणारी महिला, एल्सी नानजी या विषयी एका मुलाखतीत म्हणाली होती, तो खूप कठीण काळ होता कारण माझ्यावर फोटोग्राफर आणि मॉडेल्सची जबाबदारी होती. जरी क्लायंटने जाहिरात स्वीकारली आणि रिलीज केली असली तरी, मला त्यावेळी खूप दडपण आले होते. कारण मी एक विशिष्ट गोष्ट ठरवल्यामुळे इतर लोकांना त्रास सहन करावा लागला.

'मिलिंद सोमणला मी नग्नावस्थेत पाहिलंय'
मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली होती, न्यायालयात सिद्ध झाल्याप्रमाणे ही संपूर्ण गोष्ट अनावश्यक होती. असंवेदनशील जनतेने केलेल्या तर्कहीन निर्णयांमुळे याचा वेगळाच परिणाम झाला. मला असे वाटते की अशा परिस्थितीत लपून रहायला नको. जे आहे त्याचा सामना केला पाहिजे जेणेकरून आपण त्यातून काहीतरी मार्ग काढू शकतो. मी स्वत:ला या गोष्टीसाठी फेमस समजते की मी मिलिंद सोमणला नग्नावस्थेत पाहिले आहे.

Web Title: 'I saw Milind Soman naked'; The story behind the controversial photo came to the fore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.