​हृतिक व सुजैन पुन्हा येणार का एकत्र?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2017 14:20 IST2017-01-11T14:18:53+5:302017-01-11T14:20:01+5:30

हृतिक रोशन आणि सुजैन खान यांच्यातील मतभेद दूर झालेत? या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ असे असेल तर हृतिकच्या चाहत्यांसाठी ही ...

Hrithik and Sujain to meet again? | ​हृतिक व सुजैन पुन्हा येणार का एकत्र?

​हृतिक व सुजैन पुन्हा येणार का एकत्र?

तिक रोशन आणि सुजैन खान यांच्यातील मतभेद दूर झालेत? या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ असे असेल तर हृतिकच्या चाहत्यांसाठी ही ‘काबील’ सुपरहिट होण्यापेक्षाही मोठी बातमी आहे. होय, गेल्या महिनाभरात  हृतिक व सुजैन एकदा नाही, दोनदा नाही तर तिनदा एकत्र आलेत. काल १० जानेवारी हा हृतिकचा वाढदिवस. यानिमित्त मुंबईच्या एका रेस्टारंटमध्ये पार्टी आयोजित केली गेली होती. या पार्टीचे वैशिष्ट्य म्हणजे, या पार्टीत हृतिक व त्याची एक्स-वाईफ सुजैन खान यांनी एकत्र एन्ट्री केली.



यावेळी हृतिक व सुजैन या दोघांकडे बघून त्यांचा घटस्फोट झालाच नाही, असेच अनेकांना वाटले. पांढºया ड्रेसमध्ये हृतिकसोबत असलेल्या सुजैनची बॉडीलँग्वेजही अगदी कूल होती. घटस्फोटाआधी हृतिक व सुजैन एकत्र वावरत, अगदी तेवढ्याच कूल अंदाजात सुजैन यावेळी दिसली. हृतिकचा अंदाजही यापेक्षा काही वेगळा नव्हता. हृतिकच्या टी-शर्टवर वर लिहिलेले होते, ‘लव्ह’ आणि खाली लिहिलेले होते ‘पीस’.



हृतिक स्वत: गाडी चालवत रेस्टॉरंटमध्ये पोहोचला. सुजैन आणि त्यांची दोन्ही मुले यावेळी त्याच्यासोबत होती. हृतिकचे वडील राकेश रोशनही पत्नीसोबत या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झालेत. शिवाय हृतिकचे काका राजेश रोशन व त्यांचे कुटुंबही यावेळी दिसले. 




अगदी महिनाभरापूर्वी हृतिक व सुजैन यांनी डिनर डेट एन्जॉय केली होती. यानंतर हृतिक व सुजैन दोघांनी दुबईमध्ये मुलांसोबत न्यू ईयर सेलिब्रेशन केले होते. दुबईच्या रस्त्यांवरचे या सर्वांचे काही फोटो व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये हृतिक व सुजैन दोघांचे बॉन्डिंग पुन्हा एकदा घट्ट झाल्याचे स्पष्टपणे दिसले. एकंदर काय तर हृतिक व सुजैन दोघेही एकमेकांची कंपनी एन्जॉय करताना दिसू लागले आहे. तुमच्या-आमच्यासाठी यापेक्षा आनंदाची गोष्ट कुठली बरे असू शकेल?
 

Web Title: Hrithik and Sujain to meet again?