​सुश्मिताचे इन्स्टाग्रामवर ‘हॉट’ आगमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2016 21:23 IST2016-04-26T15:48:34+5:302016-04-26T21:23:19+5:30

सुश्मिता सेनने नुकतेच इन्स्टाग्रामवर अकाऊंट सुरू केले आहे. 

'Hot' arrival on Sushmita's Instagram | ​सुश्मिताचे इन्स्टाग्रामवर ‘हॉट’ आगमन

​सुश्मिताचे इन्स्टाग्रामवर ‘हॉट’ आगमन

स युनिव्हर्स आणि बॉलिवूड ब्युटी सुश्मिता सेन अलिकडे मोठ्या पडद्यापासून जरा दूर आहे. पण याचा अर्थ असा नाही की, तिचे करिअल गुंडाळले. वयाच्या चाळीशीत पाऊल ठेवूनही या बंगाली बालाचे सौंदर्य तसूभरही कमी झाले नाही.

याची प्रचीती तुम्हाला तिचे इन्स्टाग्राम फोटो पाहून नक्कीच मिळेल. काय म्हणाला? 

सुश्मिता आणि इन्स्टाग्रामवर? 

तुम्हाला नाही माहित?

अहो सुश्मिता सेनने नुकतेच इन्स्टाग्रामवर अकाऊंट सुरू केले आहे. आणि नुसते अकाऊंट नाही सुरू केले, तर अतिसुपर हॉट फोटोदेखील अपलोड केले आहेत. तुम्हीच पाहा!

हिंदी चित्रपटांपासून दूर असलेली सुश्मिता गेल्या वर्षी बंगाली चित्रपट ‘निरबाक’मध्ये झळकली. त्यानंतर टीव्ही शो ‘कॉमेडी सुपरस्टार्स’ या शोमध्ये तिने जज म्हणून काम केले. आता इन्स्टाग्रामवरील फोटोंद्वारे ती बॉलिवूडमध्ये पुनरागमन तर करू पाहत नाही ना?

Web Title: 'Hot' arrival on Sushmita's Instagram