स्वत:च्या बायोपिकमध्ये हरभजन सिंगला हवाय 'हा' अभिनेता; स्पष्टच म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 11:40 IST2025-05-30T11:38:19+5:302025-05-30T11:40:17+5:30
बायोपिक आला तर कोणी भूमिका साकारावी? हरभजन सिंगने घेतलं 'या' अभिनेत्याचं नाव, म्हणाला...

स्वत:च्या बायोपिकमध्ये हरभजन सिंगला हवाय 'हा' अभिनेता; स्पष्टच म्हणाला...
Harbhajan Singh : कलाक्षेत्र आणि क्रीडाविश्व यांचं अनेक वर्षांपासून खास नातं आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बॉलिवूडमध्ये अनेक लोकप्रिय खेळाडूंच्या जीवनावर आधारित चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. आपल्या आवडत्या खेळाडूंच्या बायोपिक्सने नेहमीच प्रेक्षकांना आकर्षित केलं आहे. या चित्रपटांमधून त्यांचा संघर्ष हा मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला आहे. आता अलिकडेच भारताच स्टार गोलंदाज हरभजन सिंगने (Harbhajan Singh) एका मुलाखतीमध्ये त्याच्या बायोपिकबद्दल खुलासा केला. शिवाय त्याच्या बायोपिकसाठी एका बॉलिवूड अभिनेत्याचं नाव देखील सूचवलं आहे.
नुकतीच हरभजन सिंग आणि त्याची पत्नी गीता बसराने झुम ला मुलाखत दिली. त्यादरम्यान, हरभजनला “तुझ्यावर बायोपिक आला, तर कोणत्या अभिनेत्याने भूमिका करावी?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर भज्जीने विकी कौशलचं नाव घेतलं. पुढे याबद्दल बोलताना तो म्हणाला, "विकी कौशल एक उत्तम अभिनेता आहे. शिवाय तो एक पंजाबी असून त्याची बोलण्याची पद्धत अगदी माझ्यासारखीच आहे. पण, लूक्सबद्दल म्हणाल तर, तो माझ्यापेक्षा हॅंडसम आहे. तो हे सहज करु शकेल."
त्यानंतर पुढे हरभजन सिंगच्या वक्तव्याचं समर्थन करत त्याची पत्नी गीता म्हणाली, "आम्हाला दोघांनी असंच वाटतं की, बायोपिकसाठी विकी कौशल हा परफेक्ट आहे. सध्या तो इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. सगळ्यात महत्त्वाचं तो एक पंजाबी आहे." असं म्हणत या दोघांनी हरभजन सिंगच्या बायोपिकसाठी विकी कौशलच्या नावाला पसंती दर्शवली.