Happy anniversary Priyanka and Nick : लग्नात प्रियंकाची आई होती तिच्यावर नाराज, समोर आले कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 15:01 IST2020-12-01T14:53:23+5:302020-12-01T15:01:01+5:30
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निक जोनासची आज दुसरी वेडिंग अॅनिव्हसरी सेलिब्रेट करत आहे.

Happy anniversary Priyanka and Nick : लग्नात प्रियंकाची आई होती तिच्यावर नाराज, समोर आले कारण
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निक जोनासची आज दुसरी वेडिंग अॅनिव्हसरी सेलिब्रेट करत आहे. १ डिसेंबर २०१८ रोजी हिंदू पद्धतीने तर २ डिसेंबर रोजी ख्रिश्चन पद्धतीने दोघांचं लग्न झालं. प्रियंका चोप्रा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. तिच्या आयुष्यातील आनंददायी क्षणांचे फोटोही ती सोशल मीडियावर शेअर करत असते. दोघांनी उदयपूरच्या उमेद भवनमध्ये मोठ्या धुमधडाक्यात लग्न केले. या शाही लग्नाला जवळपास 200 पाहुण्यांना बोलवण्यात आले होते. प्रियंकाची आई मधु चोप्रा लग्नातील पाहुण्यांच्या संख्येला घेऊन नाराज होत्या याचा खुलासा प्रियंकाने लग्नाच्या काही महिन्यांनंतर स्वत: केला आहे.
प्रियंकाने एलिन डिजेनरस हिच्या लोकप्रिय चॅट शोवर हजेरी लावली होती. यावेळी तिने हा खुलासा केला होता. ‘ माझे लग्न एक ग्रण्ड इव्हेंट होता. लग्नाला केवळ २०० पाहुणे होते. ज्यात माझ्या व निकच्या कुटूंबातील सदस्यांचा समावेश होता. पण या लग्नात माझी आई पूर्णवेळ नाराज होती. लग्नात मी सगळ्यांना बोलावले नाही, अशी तिची तक्रार होती. अगदी माझा हेअर ड्रेसर, ज्वेलरी डिझाईनरला निमंत्रण का दिले नाही? हेच ती विचारत होती, असे प्रियंकाने सांगितले.
मी एक खास पार्टी आयोजित करावी आणि त्यात जवळपास १५ हजार जवळच्या लोकांना बोलवावे, असाही तिचा आग्रह होता. मुलीच्या लग्नात प्रत्येकजण यावे, अशी तिची इच्छा होती आणि ही इच्छा पूर्ण न झाल्याने ती पूर्णवेळ नाराज होती, असेही प्रियंकाने सांगितले.