‘धकधक गर्ल ’ झाली इमोशनल ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2016 09:53 IST2016-07-01T04:23:49+5:302016-07-01T09:53:49+5:30

 बॉलीवूडची ‘डान्सिंग दिवा’ माधुरी दीक्षित नुकतीच एका टीव्ही शो वर इमोशनल झाली. ‘सो यू थिंक यू कॅन डान्स अब ...

'Festive Girl' Has Been Emotional? | ‘धकधक गर्ल ’ झाली इमोशनल ?

‘धकधक गर्ल ’ झाली इमोशनल ?

 
ॉलीवूडची ‘डान्सिंग दिवा’ माधुरी दीक्षित नुकतीच एका टीव्ही शो वर इमोशनल झाली. ‘सो यू थिंक यू कॅन डान्स अब इंडिया की बारी’ या डान्स टीव्ही शो मध्ये पार्किंसन रोगावर आधारित एक परफॉर्मन्स पाहून तिला अक्षरश: रडूच कोसळलेच.

शंपा आणि रयान यांनी एका अतिशय उत्कृष्ट अ‍ॅक्टचे सादरीकरण करून सर्वांना आश्चर्यचकित केले. पार्किंसन हा रोग जडलेल्या लहान मुलगी आणि मुलाची त्यांनी लव्हस्टोरी गाण्यातून मांडली होती.

सर्वांना इमोशनल करून त्यांनी अतिशय सुंदर प्रवास त्यांच्या परफॉर्मन्स मधून सादर केला. माधुरी या शो मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत असून तिच्यासोबत कोरिओग्राफर्स टेरेल्स लेविस आणि बॉस्को मार्टिस हे देखील आहेत.  

Web Title: 'Festive Girl' Has Been Emotional?