सुशांतने 5 वर्षांपूर्वी सुरु केले होते यु-ट्यूब चॅनल, पण चाहत्यांनाही नव्हती माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 13:38 IST2020-09-03T13:37:00+5:302020-09-03T13:38:11+5:30

सुशांतच्या मृत्यूच्या अडीच महिन्यानंतर समोर आली नवी माहिती, जाणून सगळेच हैराण

fans are surprised to know about sushant singh rajputs youtube channel as he never used to promote it | सुशांतने 5 वर्षांपूर्वी सुरु केले होते यु-ट्यूब चॅनल, पण चाहत्यांनाही नव्हती माहिती

सुशांतने 5 वर्षांपूर्वी सुरु केले होते यु-ट्यूब चॅनल, पण चाहत्यांनाही नव्हती माहिती

ठळक मुद्देबॉलिवूडच्या अन्य कलाकारांप्रमाणे सुशांत त्याचे यु-ट्यूब कधीच प्रमोट केले नाही, असे का? असा प्रश्नही यानिमित्ताने अनेकांना पडला.

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर त्याच्याबद्दलच्या एक ना अनेक नव्या गोष्टी समोर येत आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर सुमारे अडीच महिन्यानंतर एक अशी माहिती समोर आली की, खुद्द सुशांतचे चाहतेही हैरान झालेत. आजपर्यंत सुशांतच्या चाहत्यांनाही ही गोष्ट माहित नव्हती. होय, सुशांतने एक यु-ट्यूब चॅनल बनवले होते. मात्र अनेक चाहत्यांना याबद्दल कल्पना नव्हती. आत्ताकुठे सुशांतचे यु-ट्यूब चॅनल असल्याचे उघड झाले. हे जाणून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. बॉलिवूडच्या अन्य कलाकारांप्रमाणे सुशांत त्याचे यु-ट्यूब कधीच प्रमोट केले नाही, असे का? असा प्रश्नही यानिमित्ताने अनेकांना पडला.

सुशांतने त्याच्या  यु-ट्यूब चॅनलवर 3 ते 4 व्हिडीओ शेअर केले होते. हे सगळे त्याचे वर्कआऊट व्हिडीओ होते. 5 वर्षांपूर्वी हे  यु-ट्यूब चॅनल बनवण्यात आले होते. या चॅनलवर एकूण 1 लाखांवर सब्सक्राइबर्स होते.

तर सुशांतचे कुटुंब करणार कायदेशीर कारवाई
बुधवारी सुशांतच्या कुटुंबाचे वकील विकास सिंग यांनी मीडियाच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे इशारा दिला. कोणताही निर्माता वा दिग्दर्शक सुशांतच्या आयुष्यावर चित्रपट बनवणार नाही किंवा त्याच्या आयुष्यावर पुस्तक लिहू शकणार नाही. असे झाल्यास सुशांतचे कुटुंब कायदेशीर कारवाई करू शकते. सुशांत वा त्याच्या कुटुंबाबद्दल चुकीची माहिती देणा-या मीडिया हाऊसविरोधातही सुशांतचे कुटुंब कायदेशीर कारवाई करू शकते.

श्रुती मोदीने केला धक्कादायक खुलासा
सुशांत प्रकरणी सीबीआय तपास करत आहे. यादरम्यान सीबीआयच्या चौकशीत श्रुती मोदीने काही धक्कादायक खुलासे केलेत. सुशांतच्या घरी ड्रग्जचे पॅकेट मागवले जात असल्याचे मला कळले. यानंतर मी सुशांतसोबत काम करणे थांबल्याचे तिने सांगितले. मी सुशांतसाठी फक्त काम करायचे. ड्रग्जची माझे काहीही देणेघेणे नव्हते, असेही तिने स्पष्ट केले. श्रुती ही सुशांतची मॅनेजर होती.

Web Title: fans are surprised to know about sushant singh rajputs youtube channel as he never used to promote it