ईशा देओलने सावत्र भावाचं केलं कौतुक, म्हणाली, "गदर 2 साठी भैय्याने...'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 09:42 AM2023-08-26T09:42:30+5:302023-08-26T09:43:10+5:30

सनी देओलच्या 'गदर 2' निमित्ताने सावत्र भावंडं एकत्र आली आहेत.

esha deol s reaction on step brother sunny deol s success says he has done lot hardwork | ईशा देओलने सावत्र भावाचं केलं कौतुक, म्हणाली, "गदर 2 साठी भैय्याने...'

ईशा देओलने सावत्र भावाचं केलं कौतुक, म्हणाली, "गदर 2 साठी भैय्याने...'

googlenewsNext

८० ते ९० च्या दशकात सनी देओल (Sunny Deol) सर्वात लोकप्रिय आणि आघाडीचा अभिनेता होता. वडील धर्मेंद्र यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यानेही सिनेसृष्टीत जम बसवला. 'घायल', 'घातक, 'गदर एक प्रेम कथा', 'डर' असे एक से एक सुपरहिट चित्रपट त्याने केले. मोठ्या ब्रेकनंतर सनीने ब्लॉकबस्टर 'गदर'चा सिक्वल आणल. हा सिनेमा सध्या बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालतोय. 'गदर २' निमित्ताने सनी देओल आणि ईशा देओल (Esha Deol) ही सावत्र भावंडंही एकत्र कॅमेऱ्यात कैद झाली तेव्हा सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

'गदर 2'च्या यशामुळे देओल कुटुंब चांगलंच चर्चेत आहे. हेमा मालिनी यांची लेक ईशा देओलने नुकतेच भाऊ सनीसाठी स्पेशल स्क्रीनिंग ठेवलं. यावेळी ईशा सोबत बहीण आहानाही होती. तर सनीसोबत भाऊ बॉबी देओल दिसला. सिनेमाच्या निमित्ताने चारही भावंडं एकत्र दिसली यामुळे चर्चा सुरु झाल्या. यावर ईशाने नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, 'भैय्या सिनेमाचं शूटिंग जोरात करत आहे हे मला माहित होतं. हा सिनेमा त्याच्यासाठी खूप महत्वाचा आहे. आता सिनेमाला एवढा चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे आम्ही सगळेच त्याच्यासाठी खूप खूश आहोत. तो यासाठी पात्र आहे.फक्त सनी देओलच असं करु शकतो."

देओल कुटुंबात सगळं सुरळीत आहे, आम्ही सगळे एकत्र आहोत अशी प्रतिक्रिया नुकतीच हेमा मालिनी यांनी दिली होती. तसंच मुलांना एकत्र पाहून नवल वाटलं नाही कारण यात काही नवीन नाही असंही त्या म्हणाल्या. मात्र चाहत्यांना हे सरप्राईजच होतं. सनी देओलच्या या यशाने देओल कुटुंबीय पुन्हा एकदा प्रसिद्धीझोतात आलं आहे.

Web Title: esha deol s reaction on step brother sunny deol s success says he has done lot hardwork

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.