फिल्ममेकर असलेल्या वडिलांसोबत नातं कसं होतं? करण जोहरने पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाला-
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 12:14 IST2025-11-07T12:10:25+5:302025-11-07T12:14:09+5:30
करण जोहरने पहिल्यांदाच मुलाखतीत त्याच्या वडिलांसोबतच्या नात्याबद्दल खास खुलासा केला. काय म्हणाला करण?

फिल्ममेकर असलेल्या वडिलांसोबत नातं कसं होतं? करण जोहरने पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाला-
करण जोहर हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक. करणने काही सिनेमांमध्ये अभिनयाची छापही सोडली आहे. करण त्याची निर्मिती संस्था धर्मा प्रॉडक्शनच्या माध्यमातून सुपरहिट सिनेमांची निर्मिती करताना दिसतो. करण त्याच्या प्रत्येक सिनेमाच्या आधी वडिलांची आठवण जागवून 'मिस यू' म्हणताना दिसतो. अशातच पहिल्यांदाच करण जोहरने त्याचं वडिलांसोबत नातं कसं होतं, याचा खुलासा केलाय.
करण जोहरने वडिलांसोबतच्या नात्यावर प्रथमच सांगितलं
सानिया मिर्झासोबतच्या पॉडकास्टमध्ये करणने खुलासा केला की, तो लहान असताना कथ्थक नृत्याचे धडे घ्यायचा. एका मुलाने कथ्थक शिकणे त्या काळात अनेकांना चुकीचं वाटू शकत होतं, पण त्याचे वडील यश जोहर यांनी याबद्दल कधीच आक्षेप घेतला नाही. करण म्हणाला, "इतर वडील-मुलांच्या नात्याप्रमाणे आमचं नातं कधीच टीपिकल नव्हते. माझे वडील नेहमी मला मिठी मारायचे आणि प्रेम करायचे. मी १०० किलोचा असतानाही ते मला त्यांच्या मांडीवर बसवून माझे लाड करायचे."
तो पुढे म्हणाला, "मी कथ्थक करत आहे, याची त्यांनी कधीच काळजी केली नाही. हे नृत्य मुलींसाठी आहे, असं त्यांना कधीच वाटलं नाही. उलट, मी कथ्थक केल्यावर ते आनंदाने टाळ्या वाजवायचे. वडिलांनी कधीच माझ्या चुका दाखवल्या नाहीत. ते माझ्यावर खूप प्रेम करायचे"
१९९८ मध्ये 'कुछ कुछ होता है' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर यश जोहर यांचा आनंद गगनात मावत नव्हता. माझा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर ते लोकांना सांगायचे, 'माझा मुलगा जगातला नंबर १ डायरेक्टर आहे.' मला तेव्हा खूप लाज वाटायची, पण ते खऱ्या अर्थाने माझे फॅन होते," असं करणने सांगितले. यश जोहर यांच्यामध्ये प्रचंड माणुसकी होती. त्यांच्याकडूनच करणला दयाळू आणि इतरांना मदत करणारा स्वभाव मिळाला.
यश जोहर यांनी 'धर्मा प्रॉडक्शन'ची Dharma Productions स्थापना केली, पण त्यांच्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले होते. मात्र, आर्थिक यश हे यशची व्याख्या ठरु शकत नाही, हे त्यांनी आपल्या मुलाला शिकवलं. करण जोहरने आपल्या वडिलांचा वारसा पुढे जपला. आज धर्मा प्रॉडक्शन ही बॉलिवूडच नव्हे तर भारतातील नंबर १ निर्मिती संस्था म्हणून ओळखली जाते.