"हिंदी सिनेमा करताना एखाद्या अपंग माणसासारखं वाटतं"; 'सिकंदर' फ्लॉप झाल्यावर दिग्दर्शकाचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 16:29 IST2025-07-30T16:28:33+5:302025-07-30T16:29:01+5:30

'सिकंदर' सिनेमा फ्लॉप झाल्यावर तब्बल ४ महिन्यांनी सिनेमाचे दिग्दर्शक ए. आर. मुरुगादोस यांनी मौन सोडलंय. काय म्हणाले?

Director a r murugadoss big statement after salman khan Sikander flopped in theatres | "हिंदी सिनेमा करताना एखाद्या अपंग माणसासारखं वाटतं"; 'सिकंदर' फ्लॉप झाल्यावर दिग्दर्शकाचं मोठं विधान

"हिंदी सिनेमा करताना एखाद्या अपंग माणसासारखं वाटतं"; 'सिकंदर' फ्लॉप झाल्यावर दिग्दर्शकाचं मोठं विधान

'गजनी', 'हॉलिडे' फेम दक्षिणात्य दिग्दर्शक ए.आर. मुरुगादोस यांनी नुकताच दिग्दर्शित केलेला 'सिकंदर' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला. सलमान खानने 'सिकंदर' सिनेमात प्रमुख भूमिका साकारली होती. हा सिनेमा चालेल अशी सर्वांना आशा होती. परंतु कमजोर कथानकामुळे लोकांनी 'सिकंदर' सिनेमाकडे पाठ फिरवली. या सिनेमाचे दिग्दर्शक ए. आर. मुरुगादोस यांनी एका मुलाखतीत 'सिकंदर' सिनेमाच्या अपयशावर स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले मुरुगादोस, जाणून घ्या.

'सिकंदर' सिनेमाबद्दल मुरुगादोस काय म्हणाले?

एका मुलाखतीत मुरुगादोस म्हणाले की, "हिंदी चित्रपट करताना मला एखाद्या अपंग माणसासारखं वाटतं. मूळ कल्पना डोक्यात असली, तरी ती हिंदीत प्रभावीपणे सादर करता येत नाही. जेव्हा मी तमिळमध्ये चित्रपट करतो तेव्हा मला संवाद, भावना, दृश्य सगळं मनापासून करता येतं. पण हिंदी चित्रपट बनवताना मी पटकथा इंग्रजीत लिहितो आणि ती नंतर हिंदीत अनुवादित केली जाते. त्यामुळे संवादांमधली तो खरा जिवंतपणा हरवतो." त्यांनी याचे उदाहरण म्हणून 'सिकंदर'चा उल्लेख केला, जो सलमान खानसारखा सुपरस्टार असूनही प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडू शकला नाही.

या चित्रपटाच्या निर्मितीत अनेक अडथळे आले. मुरुगादोस म्हणाले की, "संपूर्ण टीमचा विचार करता, सगळ्यांना माझ्या कल्पना समजावून सांगणं आणि त्यांना अंमलात आणणं हे आव्हानात्मक ठरतं." त्यांना असंही वाटतं की, दिग्दर्शक म्हणून जे स्वातंत्र्य त्यांना दक्षिणात्य चित्रपटांमध्ये मिळतं, ते हिंदी सिनेमात मिळत नाही.

'सिकंदर' या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. सलमान खान, रश्मिका मंदाना आणि जबरदस्त अ‍ॅक्शन दृश्यांसह हा चित्रपट मोठ्या प्रमाणात प्रमोट करण्यात आला होता. मात्र कथानकातील गडबड, संवादातील प्रभाव या बाबी प्रेक्षकांना भावल्या नाहीत. त्यामुळे बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. 'सिकंदर' सिनेमामुळे सलमान खानच्या खानच्या करिअरमध्ये मात्र आणखी एक फ्लॉप सिनेमा समाविष्ट झाला.

Web Title: Director a r murugadoss big statement after salman khan Sikander flopped in theatres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.