'या' ठिकाणी होणार धर्मेंद्र यांची पहिली जयंती, चाहत्यांनाही प्रवेश मिळणार? देओल कुटुंबाचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 17:36 IST2025-12-04T17:32:46+5:302025-12-04T17:36:50+5:30

धर्मेंद्र यांची जयंती ८ डिसेंबरला आहे. त्यानिमित्त देओल कुटुंबाने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे धर्मेंद्र यांच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे

Dharmendra first birth anniversary will be celebrated at khandala farm house also invite fans | 'या' ठिकाणी होणार धर्मेंद्र यांची पहिली जयंती, चाहत्यांनाही प्रवेश मिळणार? देओल कुटुंबाचा मोठा निर्णय

'या' ठिकाणी होणार धर्मेंद्र यांची पहिली जयंती, चाहत्यांनाही प्रवेश मिळणार? देओल कुटुंबाचा मोठा निर्णय

दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झाल्याने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. धर्मेंद्र यांच्या निधनाच्या धक्क्यातून देओल कुटुंब अजून सावरलं नाहीये. धर्मेंद्र यांच्या चाहत्यांना त्यांचं अंतिम दर्शन घेता आलं नाही. देओल कुटुंबाने अत्यंत खासगी पद्धतीने धर्मेंद्र यांचे अंत्यंस्कार केले. येत्या ८ डिसेंबरला धर्मेंद्र यांची पहिली जयंती आहे. त्यानिमित्त देओल कुटुंंबाने चाहत्यांसाठी मोठा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, सनी आणि बॉबी देओलने धर्मेंद्र यांची पहिली जयंती त्यांच्या आवडत्या ठिकाणी करायचं ठरवलं आहे. रिपोर्टसनुसार, देओल कुटुंबाच्या निकटवर्तीयाने सांगितलं की, खंडाळा येथे धर्मेंद्र यांचा आवडता फार्महाऊस आहे. त्याच ठिकाणी धर्मेंद्र यांची जयंती साजरी करण्याचा निर्णय त्यांच्या चाहत्यांनी घेतला आहे. त्यावेळी धर्मेंद्र यांच्या चाहत्यांनाही प्रवेश मिळणार असल्याची शक्यता आहे.  

धर्मेंद्र यांच्या असंख्य चाहत्यांना अभिनेत्याचं अंतिम दर्शन घेता आलं नाही. म्हणूनच धर्मेंद्र यांच्या जयंतीच्या दिवशी खंडाळा येथील फार्महाऊस धर्मेंद्र यांच्या चाहत्यांसाठी खुलं करण्यात येणार आहे. त्यामुळे धर्मेंद्र यांच्या चाहत्यांना अभिनेत्याला श्रद्धांजली देता येईल. ''हा कोणताही विशेष फॅन इव्हेंट नसेल. धर्मेंद्र यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी चाहत्यांना फार्म हाऊसमध्ये येता येईल. फार्महाऊसवर येण्यासाठी देओल कुटुंबाकडून विशेष वाहनांची सोयही केली असेल. यासंबंधीचा तपशील लवकरच शेअर करण्यात येईल'', असं देओल कुटुंबाच्या निकटवर्तीयाने सांगितलं. 

खंडाळा येथील फार्महाऊस धर्मेंद्र यांचं आवडतं ठिकाण होतं. ते अनेकदा तिथे कुटुंबासोबत वेळ घालवायते. फार्महाऊसवर धर्मेंद्र शेती करायचे आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचे. त्यामुळे धर्मेंद्र यांच्या आवडत्या ठिकाणी त्यांची पहिली जयंती करण्याचा निर्णय देओल कुटुंबाने घेतला आहे. याविषयी देओल कुटुंब लवकरच अधिकृत माहिती सांगण्याची शक्यता आहे.

Web Title : धर्मेंद्र की पहली जयंती खंडाला फार्महाउस में मनाई जाएगी।

Web Summary : धर्मेंद्र की पहली जयंती 8 दिसंबर को उनके खंडाला फार्महाउस पर मनाई जाएगी। प्रशंसकों को श्रद्धांजलि देने की अनुमति दी जा सकती है। देओल परिवार जल्द ही अधिक जानकारी साझा करने की उम्मीद है।

Web Title : Dharmendra's first birth anniversary to be held at Khandala farmhouse.

Web Summary : Dharmendra's first birth anniversary will be celebrated at his Khandala farmhouse on December 8. Fans may be allowed to pay their respects. The Deol family is expected to share more details soon.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.