'धक धक' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज; चार महिलांच्या रोड ट्रिपची दमदार कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 17:20 IST2023-10-09T17:15:55+5:302023-10-09T17:20:33+5:30
'धक धक' या चित्रपटाचा दमदार ट्रेलर आज रिलीज झाला आहे.

Dhak Dhak trailer
'जिंदगी ना मिलेगी दोबारा' हा चित्रपट तुम्ही पाहिलायं का? त्या चित्रपटामध्ये तीन मित्र आणि त्यांचं आयुष्य बदलणारी ट्रीप अत्यंत रंजक पद्धतीने दाखवण्यात आली होती. असाच आणखी एक सिनेमा येतोय, ज्याचं नाव आहे 'धक धक'. आज या चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे.
'धक धक' या सिनेमात रत्ना पाठक शाह, दिया मिर्झा, फातिमा सना शेख आणि संजना संघी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. वेगवेगळ्या वयोगटातील आणि वेगवेगळ्या पार्श्वभूमी असलेल्या चार महिलांची ही गोष्ट आहे. एका रोड ट्रीपला निघालेल्या चौघींजणी आणि त्यांना येणारे अडथळे हे 'धक धक' या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.
या चित्रपटाच्या ट्रेलरला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. दमदार असा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षक 'धक धक' या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 13 ऑक्टोबर 2023 रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
'धक धक' चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा तरुण दुडेजा यांनी सांभाळली. तर पारिजात जोशी आणि तरुण दुडेजा यांनी मिळून ही कथा लिहिली आहे. तर तापसी पन्नू ही धक धक या चित्रपटाची सह-निर्माती आहे. या चित्रपटाचे शूटिंग नवी दिल्ली, ग्रेटर नोएडा, मनाली, लेह आणि लडाख येथे झाले आहे.