"आम्ही दोघे गप्पा मारत असताना ती किंचाळते, आणि..."; दीपिका पादुकोणचा लेकीविषयी खास खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 13:30 IST2026-03-06T13:13:43+5:302026-03-06T13:30:30+5:30
बॉलिवूडची लाडकी जोडी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग सध्या दुआच्या जन्मामुळे पालकत्वाचा आनंद घेत आहेत. दीपिका सोशल मीडियावर फारशी सक्रीय नसली, तरी अधूनमधून ती दुआबद्दलच्या खास गोष्टी चाहत्यांशी शेअर करत असते

"आम्ही दोघे गप्पा मारत असताना ती किंचाळते, आणि..."; दीपिका पादुकोणचा लेकीविषयी खास खुलासा
बॉलिवूडची लाडकी जोडी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग सध्या दुआच्या जन्मामुळे पालकत्वाचा आनंद घेत आहेत. दीपिका सोशल मीडियावर फारशी सक्रीय नसली, तरी अधूनमधून ती दुआबद्दलच्या खास गोष्टी चाहत्यांशी शेअर करत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दीपिकाने दुआच्या एका मजेशीर सवयीबद्दल सांगितले आहे, ज्यामुळे सध्या दीपिकाच्या वक्तव्याची खूप चर्चा आहे.
दीपिकाने सांगितले की, जेव्हा ती आणि रणवीर एकमेकांशी काही चर्चा करत असतात किंवा गप्पा मारत असतात, तेव्हा छोटी दुआ शांत बसत नाही. "आम्ही दोघांनी बोलायला सुरुवात केली की दुआ मध्येच विविध आवाज काढते किंचाळायला लागते" असे दीपिकाने हसत सांगितले. जणू काही तिलाही त्यांच्या संवादाचा भाग व्हायचे असते किंवा तिचे अस्तित्व जाणवून द्यायचे असते, अशा भावना दीपिकाने व्यक्त केल्या. दुआचे हे वागणे अतिशय निरागस असून त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहते.
रणवीर सिंगबद्दल बोलताना दीपिका म्हणाली की, तो एक उत्तम पिता आहे. कामाच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून तो दुआसोबत वेळ घालवतो. जेव्हा दीपिका कामात असते, तेव्हा रणवीर दुआची पूर्ण काळजी घेतो. या दोघांच्या संवादात जेव्हा दुआ तिचा आवाज सुरू करुन तिचं अस्तित्व दाखवते, तेव्हा रणवीरला त्याचे खूप कौतुक वाटते आणि तो तिच्याशी खेळण्यात मग्न होतो.
दीपिकाने शेअर केलेल्या या छोट्याशा किस्सावर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. "मुलं खरोखरच घर आनंदाने भरून टाकतात," अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. दीपिका आणि रणवीरने त्यांच्या मुलीचे नाव 'दुआ' ठेवले आहे, ज्याचा अर्थ 'प्रार्थना' असा होतो. आपल्या प्रार्थनेचे फळ म्हणून दुआ त्यांच्या आयुष्यात आल्याचे या जोडप्याने नाव जाहीर करताना म्हटले होते. सध्या दीपिकाने आपल्या प्रोजेक्ट्समधून थोडा ब्रेक घेतला असून तिचे पूर्ण लक्ष दुआवर आहे. दीपिका लवकरच 'किंग' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.