"लेकीपासून ब्रेक घेते अन्..."; दीपिका पादुकोणने शेअर केलेली पोस्ट चर्चेत; काय म्हणाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 18:07 IST2026-03-02T17:54:54+5:302026-03-02T18:07:59+5:30

दीपिकाने आई झाल्यानंतर मुलीला वेळ देण्यासाठी अनेक प्रोजेक्टवर पाणी सोडलं. पण आता दीपिकाने लेकीविषयी केलेली खास पोस्ट चर्चेत आहे. काय म्हणाली दीपिका?

Deepika Padukone big statement on motherhood and taking break from daughter dua | "लेकीपासून ब्रेक घेते अन्..."; दीपिका पादुकोणने शेअर केलेली पोस्ट चर्चेत; काय म्हणाली?

"लेकीपासून ब्रेक घेते अन्..."; दीपिका पादुकोणने शेअर केलेली पोस्ट चर्चेत; काय म्हणाली?

बॉलिवूडची 'मस्तानी' दीपिका पादुकोण सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. दीपिकाने काहीच दिवसांपूर्वी रणवीर आणि लेक दुआसोबत फोटो शेअर केले. हे फोटो शेअर करताच दीपिकाच्या चाहत्यांनी या फोटोंवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला. दीपिकाने आई झाल्यानंतर मुलीला वेळ देण्यासाठी अनेक प्रोजेक्टवर पाणी सोडलं. पण आता दीपिकाने लेकीविषयी केलेली खास पोस्ट चर्चेत आहे. काय म्हणाली दीपिका?

दीपिकाने सोशल मीडियावर एक मीम शेअर केले आहे. हे मीम लिहिलंय की, जेव्हा ती आपल्या मुलीसोबत असते, तेव्हा तिला प्रचंड थकवा जाणवतो आणि तिला एकटं राहण्यासाठी ब्रेक हवा असतो. मात्र, जेव्हा ती मुलीपासून ब्रेक घेते आणि मुलीपासून लांब असते, तेव्हा तिला सतत मुलीची आठवण येते आणि तिला काहीसं अपराधी वाटते. दीपिकाने यालाच आपली 'टॉक्सिक ट्रेट' (वाई सवय) म्हटलं आहे, जी अनेक आईंना अनुभवावी लागते. दीपिकाने हे मीम शेअर करुन तिची अवस्थाही अशीच असल्याची सहमती दर्शवली आहे.

Deepika post

सप्टेंबर २०२४ मध्ये दीपिका आणि रणवीर सिंग यांच्या आयुष्यात 'दुआ'चे आगमन झाले. तेव्हापासून दीपिका चित्रपटांपासून लांब असून तिचे पूर्ण लक्ष मुलीवर आहे. मात्र, आई झाल्यानंतर येणारा शारीरिक थकवा आणि मानसिक ताण यावर दीपिकाने अतिशय प्रामाणिकपणे आपले मत मांडले आहे. "मला मुलीपासून ब्रेक हवा असतो, पण ब्रेक घेतल्यावर पुन्हा मुलीकडेच तिथेच जावंसं वाटतं," असे तिने या पोस्टमधून लिहिलं आहे.

दीपिकाची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, अनेक महिलांनी यावर कमेंट करत "हेच आमचेही वास्तव आहे," असे म्हटले आहे. सेलिब्रिटी असूनही दीपिकाने सामान्य महिलांप्रमाणेच आपल्या भावना व्यक्त केल्यामुळे तिचे कौतुक होत आहे. मुलांच्या संगोपनात आईला स्वतःसाठी वेळ हवा असणे यात काहीच चुकीचे नाही, असा सल्लाही अनेक चाहत्यांनी तिला दिला आहे. दीपिका लवकरच शाहरुख खानसोबत 'किंग' सिनेमात काम करणार आहे.

Web Title : दीपिका पादुकोण का मातृत्व ब्रेक पर पोस्ट, चर्चा में आई।

Web Summary : दीपिका पादुकोण ने मातृत्व की भावनाओं को दर्शाते हुए एक मीम साझा किया: ब्रेक की आवश्यकता और फिर बेटी दुआ को याद करना। उन्होंने थकान और भावनात्मक तनाव को ईमानदारी से व्यक्त किया, जो कई माताओं को पसंद आया। वह जल्द ही शाहरुख खान के साथ 'किंग' में दिखेंगी।

Web Title : Deepika Padukone's post about motherhood break sparks discussion.

Web Summary : Deepika Padukone shared a meme about the conflicting feelings of motherhood: needing a break, then missing her daughter Dua. She honestly expresses the fatigue and emotional strain, resonating with many mothers online. She will soon be seen in 'King' with Shah Rukh Khan.