'सुल्तान'च्या शूटिंगचा पहिला टप्पा पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 01:18 IST2016-01-16T01:08:35+5:302016-02-12T01:18:23+5:30

सु परस्टार सलमान खानचा आगामी बहुचर्चित 'सुल्तान' चित्रपटाच्या पहिल्या भागाची शूटिंग पूर्ण झाली आहे. यात सलमानने पहलवानाची भूमिका केली ...

Complete the first stage of shooting of 'Sultan' | 'सुल्तान'च्या शूटिंगचा पहिला टप्पा पूर्ण

'सुल्तान'च्या शूटिंगचा पहिला टप्पा पूर्ण

परस्टार सलमान खानचा आगामी बहुचर्चित 'सुल्तान' चित्रपटाच्या पहिल्या भागाची शूटिंग पूर्ण झाली आहे. यात सलमानने पहलवानाची भूमिका केली आहे. दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी २0११ मध्ये 'मेरे ब्रदर की दुल्हन' या चित्रपटापासून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात डेब्यू केला आहे. अली जफर यांनी टिवटरवर २0 दिवसांत पहिल्या भागाचे शूटिंग झाल्याचे शेअर केले आहे. आणखी ९0 दिवसांचे शूटिंग करणे बाकी आहे. चित्रपटाची टीम आणि बजरंगी भाईजान फेम सलमान कर्जतमध्ये शूट करतोय. सलमानने हरयाणाच्या पहेलवानाची भूमिका केली आहे. चित्रपटातील मुख्य भूमिकेतील हिरोईन अजून जाहीर व्हायची आहे. हा चित्रपट शाहरूख खानच्या 'रईस' चित्रपटासोबत ८ जुलै २0१६ रोजी रिलीज होईल.

Web Title: Complete the first stage of shooting of 'Sultan'