'छावा'ची टीम शिर्डीला पोहोचली, विकी कौशल-रश्मिका मंदानाने घेतलं साईबाबांचं दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 17:17 IST2025-02-12T17:16:11+5:302025-02-12T17:17:08+5:30
सध्या 'छावा'ची टीम सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे.

'छावा'ची टीम शिर्डीला पोहोचली, विकी कौशल-रश्मिका मंदानाने घेतलं साईबाबांचं दर्शन
विकी कौशलचा (Vicky Kaushal) बहुप्रतिक्षित 'छावा' (Chhaava)सिनेमा १४ फेब्रुवारी रोजी रिलीज होत आहे. या सिनेमात त्याने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. सध्या 'छावा'ची टीम सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. काही दिवसांपूर्वीच विकी छत्रपती संभाजीनगर शहरातही गेला होता. नंतर त्याने अमृतसर येथील सुवर्णमंदिराला भेट दिली. तर आता तो शिर्डीला साई बाबांच्या दर्शनसाठी पोहोचला आहे.
शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी अनेक सेलिब्रिटी येतात. शिल्पा शेट्टीसह काही बॉलिवूड कलाकारांनी साईबाबांचं दर्शन घेतलं आहे. तर आता 'छावा' विकी कौशलही शिर्डीला पोहोचला आहे. त्याच्यासोबत रश्मिका मंदानाही आहे. रश्मिका सिनेमा महाराणी येसुबाईंच्या भूमिकेत आहे. रॉयल ब्लू रंगाचा कुर्ता या लूकमध्ये विकी पोहोचला. तर रश्मिकानेही साधा निळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. दोघंही साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाले. सिनेमासाठी त्यांनी आशीर्वाद घेतले. त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांचीही मोठी गर्दी झाली. त्यांचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Vicky and Rushie at shirdi 😍🤍#VickyKaushal#RashmikaMandanna#Chhaava pic.twitter.com/k0nddluOAT
— Virosh trends (@rowdyrashmika) February 12, 2025
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी कतरिना कैफनेही सासूसह शिर्डीला जात साईबाबांचं दर्शन घेतलं होतं. विकीच्या सिनेमाला यश मिळावं अशी प्रार्थना त्यांनी केली होती. तर आता स्वत: विकीनेही दर्शन घेतलं.
'छावा'सिनेमाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकरांनी केलं आहे. सिनेमात अक्षय खन्ना औरंगजेबच्या भूमिकेत आहे. तसंच सिनेमात आशुतोष राणा, संतोष जुवेकर, डायना पेंटी हेही कलाकार आहेत.