"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 09:46 IST2025-11-05T09:45:13+5:302025-11-05T09:46:27+5:30
कॅनडामध्ये झालेल्या एका शोमध्ये माधुरी दीक्षित तब्बल ३ तास उशीरा गेली. अखेर शोच्या आयोजकांनी खरं काय ते सांगितलं आणि स्पष्टीकरण दिलं

"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) तिच्या कॅनडातील शोमध्ये तीन तास उशीर आल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त करत रिफंडची मागणी केली. अखेर या प्रकरणानंतर शोची आयोजक कंपनी 'ट्रू साउंड लाइव्ह लिमिटेड'ने या एक अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. चूक नक्की कोणाची होती? या गोष्टीचा यामुळे खुलासा झालाय.
माधुरीला यायला ३ तास उशीर का झाला?
कंपनीने आपल्या निवेदनात स्पष्टपणे सांगितले की, सोशल मीडियावर पसरलेल्या गैरसमजुतींमध्ये काही अर्थ नाही. कंपनीच्या दाव्यानुसार, टोरंटो येथील ग्रेट कॅनेडियन कसीनो रिसॉर्टमध्ये आयोजित हा कार्यक्रम ठरलेल्या वेळेवरच सुरू झाला होता. सुरुवातीला 'इंडियन आयडॉल'च्या गायकांनी स्टेजवर सादरीकरण केले. मात्र, माधुरी दीक्षितच्या मुख्य कार्यक्रमाला उशीर झाला. यासाठी आयोजकांनी माधुरीच्या टीमला जबाबदार धरलं आहे.
🚨 Madhuri Dixit’s Toronto show “Dil Se.. Madhuri” left fans upset after a 3-hour delay turned the much-hyped concert into what many called a talk session
— Nabila Jamal (@nabilajamal_) November 4, 2025
The event at Great Canadian Casino Resort started at 7:30 pm but Madhuri arrived around 10 pm. Fans said there were only… pic.twitter.com/c3bZpC9P3F
आयोजकांनी स्पष्ट केलं की, कार्यक्रमाचे स्वरूप आधीच ठरलेले होते. रात्री ८:३० वाजता प्रश्न-उत्तरांंचं सेशन आणि त्यानंतर माधुरी दीक्षितचा ६० मिनिटांचा लाइव्ह परफॉर्मन्स होणार होता. कंपनीच्या प्रोडक्शन टीमने सर्व तयारी केली होती, पण माधुरीच्या मॅनेजमेंट टीमने तिला 'कॉल टाइम' चुकीचा दिला. याच कारणामुळे माधुरी रात्री जवळपास १० वाजता पोहोचली आणि त्यामुळे मोठा उशीर झाला. माधुरीचं ३ तास उशीरा येणं आमच्या नियंत्रणाबाहेर होतं.
'ट्रू साउंड लाइव्ह लिमिटेड'ने दावा केला की, त्यांनी स्टेज, लाइटिंग, साउंड या सर्व व्यवस्था व्यवस्थित पूर्ण केल्या होत्या. परंतु बॅकस्टेजच्या इथे उपस्थित असलेले काही लोक, ज्यात श्रेया गुप्ता हिचाही समावेश आहे, ते त्यांच्या खाजगी व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये व्यस्त होते. त्यामुळे कार्यक्रम वेळेवर सुरु होण्यास त्यांनी कोणतंही सहकार्य केलं नाही. जर सर्वांनी एकमेकांशी व्यवस्थित संपर्क ठेवला असता, तर हा उशीर टाळता आला असता, असं आयोजकांनी म्हटलं.
चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी
या विलंबाबद्दल टोरंटो येथे उपस्थित असलेल्या अनेक भारतीय दर्शकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. काही चाहत्यांनी हा कार्यक्रम 'वेळेचा आणि पैशाचा अपव्यय' असल्याचं म्हटलं, तर काहींनी पैसे परत देण्याची मागणी केली. दर्शकांच्या भावनांशी आयोजक सहमत असून भविष्यात अशा चुका टाळण्याचं आश्वासन दिलं आहे.