हेमामालिनी अजूनही साऊथच्या प्रेमात; अल्लू अर्जुनचं कौतुक करत बॉलिवूड स्टारवर साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 16:32 IST2023-05-12T16:32:07+5:302023-05-12T16:32:57+5:30
Hema malini: 'पुष्पा' सिनेमाचं कौतुक करत असताना त्यांनी बॉलिवूड कलाकारांना मात्र टोमणा मारला.

हेमामालिनी अजूनही साऊथच्या प्रेमात; अल्लू अर्जुनचं कौतुक करत बॉलिवूड स्टारवर साधला निशाणा
गेल्या वर्षभरात दाक्षिणात्य कलाविश्वातील गाजलेला सिनेमा कोणता असा प्रश्न विचारला तर सहाजिकच अल्लू अर्जुनच्या पुष्पा या सिनेमाचं नाव घेतलं जाईल. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने देशासह विदेशातही डंका वाजवला. पहिला भाग सुपरहिट ठरल्यानंतर आता ‘पुष्पा : दि रूल’ (Pushpa: The Rule) हा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. यामध्येच या सिनेमाविषयी आणि अल्लू अर्जुनविषयी (Allu Arjun) अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांनी भाष्य केलं आहे. इतकंच नाही तर या सिनेमाचं कौतुक करताना त्यांनी बॉलिवूड कलाकारांना टोमणा मारला आहे.
अलिकडेच हेमा मालिनी यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी या सिनेमाविषयी भाष्य केलं. "मी पुष्पा सिनेमा पाहिला आणि मला तो खरंच आवडला. या सिनेमातील एका गाण्यातील हूक स्टेप आज फेमस झालीये. या गाण्यात अल्लू अर्जुनचा डान्स मला विशेष भावला. यानंतर मी अल्लू अर्जूनचा आणखी एक सिनेमा पाहिला. यातून माझ्या एक लक्षात आलं तो गुड लुकिंग मुलगा आहे. पुष्पामध्ये तो खूपच वेगळा दिसत होता", असं हेमा मालिनी म्हणाल्या.
पुढे त्या म्हणतात, "पुष्पामधील त्याचा लूक खूप वेगळा होता. विशेष म्हणजे या लूकसाठी त्याने होकार दर्शवला. नाही तर आमच्या हिंदी सिनेमातील हिरोंनी थोडी असा गेटअप केला असता. मला चांगलं आठवतंय सुल्तान सिनेमात धर्मेंद्र यांना थोडा डार्क मेकअप करायचा होता. पण ते सावळा रंग करायला तयार नव्हते. शेवटी दिग्दर्शकांच्या सांगण्यावरुन ते तयार "