नव्या अध्यायाला लवकरच सुरुवात! अक्षय कुमारच्या 'केसरी'चा सीक्वल येणार? अभिनेत्याने दिली मोठी हिंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 12:43 IST2025-03-21T12:39:36+5:302025-03-21T12:43:43+5:30
अक्षय कुमारच्या 'केसरी'चा सीक्वल येणार? अभिनेता पोस्ट शेअर करत म्हणाला...

नव्या अध्यायाला लवकरच सुरुवात! अक्षय कुमारच्या 'केसरी'चा सीक्वल येणार? अभिनेत्याने दिली मोठी हिंट
Akshay Kumar Post:अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) प्रमुख भूमिकेत असलेला 'केसरी' हा चित्रपट २१ मार्च २०१९ ला सर्वत्र प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. केसरी' हा चित्रपट सारागढीच्या युद्धावर आधारीत आहे. ३६ व्या शीख रेजिमेंटचे २१ सैनिक आणि दहा हजार अफगाण सैनिकांमध्ये झालेल्या सारागढीच्या युद्धाची कथा या 'केसरी'मध्ये आहे. अनुराग सिंग यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटात अक्षय कुमारने इशर सिंग यांची भूमिका साकारली आहे. अशातच या जवळपास ६ वर्षानंतर चित्रपटाचा सीक्वल येण्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, 'केसरी' चित्रपटाला प्रदर्शित होऊन ६ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने अभिनेता अक्षय कुमारने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे अभिनेत्याने केसरीच्या पार्ट-२ बद्दल चाहत्यांना हिंट दिली आहे. शिवाय लवकरच याबद्दल अधिकृत घोषणा देखील करण्यात येईल,असं त्याने म्हटलं आहे. अक्षय कुमारने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये म्हटलंय, "केसरीच्या यशाची ६ वर्ष पूर्ण...; 'केसरी' शौर्याची कहाणी..., नव्या अध्यायाला लवकरच सुरुवात करतो आहोत...", अशी पोस्ट अभिनेत्याने लिहिली आहे. त्यामुळे या चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अक्षय कुमारच्या चित्रपटाचा सीक्वल येणार असल्याचं कळताच त्याचे फॅन्स प्रचंड खूश आहेत.
'केसरी' च्या यशानंतर आता चित्रपटाच्या सीक्वलबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता निर्माण झाली आहे. परंतु याबाबत चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्याचबरोबर कलाकारांची नावं सुद्धा गुलदस्त्यात आहेत.