विमानात प्रवास करणारे भारतीय पुरुष 'असभ्य', अभिनेत्री सयानी गुप्ता भडकली; नेटकऱ्यांनी केली टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 16:18 IST2023-10-30T16:16:24+5:302023-10-30T16:18:20+5:30
सयानीची पोस्ट वाचून नेटकऱ्यांनी तिचीच शाळा घेतली आहे.

विमानात प्रवास करणारे भारतीय पुरुष 'असभ्य', अभिनेत्री सयानी गुप्ता भडकली; नेटकऱ्यांनी केली टीका
अभिनेत्री सयानी गुप्ताने (Sayani Gupta) अनेक वेबसिरीज आणि सिनेमांमधून प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. मायानगरीत आपल्या एक दशकाहून अधिकच्या करियरमध्ये तिने 'फॅन','मार्गारिटा विद अ स्ट्रॉ','आर्टिकल 15' आणि 'पार्च्ड' सारख्या अनेक सिनेमात काम केलं आहे. नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत विमानातील भारतीय पुरुषांवर जोरदार टीका केली आहे आणि त्यांना असभ्य म्हटलं आहे.
सयानी गुप्ताने विमानात भारतीय पुरुष कसं वर्तवणूक करतात याबद्दल भाष्य केलं आहे. पुरुषांच्या असभ्य व्यवहारावर तिने बोट ठेवलं आहे. ती लिहिते,'फ्लाईटमध्ये भारतीय पुरुष अतिशय असभ्य असतात. जोरजोरात फोनचा आवाज, इतर आवाज, खोकताना/शिंकताना तोंडावर हात न ठेवणे, अविचारी. एका माणसाची बॅग तर मला लागणारच होती इतक्या जवळून गेली. आणि त्या माणसाला याचं भानही नव्हतं. मला माहितीये की अनेक जण माझी पोस्ट वाचत असतील आणि याबाबतीत सहमत नसतील.'
सयानीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. काही जण तिच्या बोलण्याशी सहमत आहेत तर काहींनी तिच्यावरच टीका केली आहे. एकाने लिहिले, 'जर आम्ही म्हणालो की सगळ्या मुली एकसारख्याच असतात तर हिला वाईट वाटेल.' तर दुसऱ्याने लिहिले,'मला फ्लाईटमध्ये अशा असभ्य मुलींचा अनुभव आला आहे.'
सयानीने शेवटचं 'झ्विगॅटो' सिनेमात कपिल शर्मासोबत काम केलं. तिने आतापर्यंत 'जॉली एल एल बी 2', 'पगलैट', 'शेरदिल', 'फोर मोर शॉट्स प्लीज' या सिनेमात काम केलं आहे.