भररस्त्यात बाचाबाची अन् ड्रायव्हरला मारहाण; 'त्या' व्हायरल व्हिडीओनंतर प्रकरण गेलेलं पोलिसांत, रवीना टंडन म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 11:31 IST2026-05-18T11:22:53+5:302026-05-18T11:31:50+5:30

"सेलिब्रिटींना टार्गेट करणं...", रवीना टंडनने 'त्या' व्हायरल व्हिडीओ प्रकरणी अखेर सोडलं मौन, म्हणाली-"खूप वाईट…"

bollywood actress raveena tandon recall that 2024 mob incident know about what exactly happened | भररस्त्यात बाचाबाची अन् ड्रायव्हरला मारहाण; 'त्या' व्हायरल व्हिडीओनंतर प्रकरण गेलेलं पोलिसांत, रवीना टंडन म्हणाली...

भररस्त्यात बाचाबाची अन् ड्रायव्हरला मारहाण; 'त्या' व्हायरल व्हिडीओनंतर प्रकरण गेलेलं पोलिसांत, रवीना टंडन म्हणाली...

Raveena Tandon: ९० च्या दशकातील अनेक चित्रपट आणि गाण्यांमधून आपल्या नृत्याने प्रेक्षकांचे हृदय जिंकणारी प्रसिध्द अभिनेत्री म्हणजे रवीना टंडन (Raveena Tandon). रवीनाने अनेक सुपरहिट चित्रपटातून कामे केली. यात 'मोहरा', 'खिलाडियों का खिलाडी', 'जिद्दी', 'अंदाज अपना अपना','घरवाली बाहरवाली','लाडला' अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये तिने अभिनय केला आहे. दरम्यान, आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी ही नायिका दोन वर्षापूर्वी घडलेल्या एका प्रकरणामुळे प्रचंड चर्चेत आली होती. अभिनेत्रीच्या वाहनचालकाची रस्त्यात काही स्थानिकांशी बाचाबाची झाल्याचा व्हिडीओ २ जून रोजी व्हायरल झाला होता.यानंतर स्थानिकांनी तिच्या भांडण केलं आणि तिला धक्काबुक्की केली होती. या घटनेचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. या प्रकरणावर आता रवीना टंडनने मौन सोडलं आहे.

अलिकडेच 'ई-टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या इंडस्ट्रीतील प्रवास आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केलं. दरम्यान, अभिनेत्रीला २०२४ च्या घटनेबद्दलही विचारण्यात आलं. त्या घटनेबद्दल बोलताना रवीना म्हणाली,"तो व्हिडिओ एडिट करण्याचे खूप प्रयत्न करण्यात आले. हा पूर्णपणे एक कट होता, असं पोलिसांनी सांगितलं. त्या लोकांना फक्त गोंधळ घालायचा होता. काहीही घडलं नसतानाही ते आमच्यावर विनाकारण आरोप करत होते. त्या भागात बरेच लोक माझ्या ओळखीचे आहेत."  पुढे रवीना म्हणाली," त्यावेळी काही लोक माझ्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत होते. माझी मुलं घरी होती आणि माझे पती ऑफिसमध्ये होते. अशावेळी मी कोणाला माझ्या घरात येऊ दिलं असतं का? ते लोक आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत होते."

त्या क्षणी नेमकं काय घडलं ...

दरम्यान, त्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रवीना मद्यधुंद अवस्थेत होती आणि तिने आपल्यावर हल्ला केला, असे खोटे आरोप या लोकांनी केले होते. या आरोपांवर पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आणि अभिनेत्री किंवा तिचा ड्रायव्हर दारू प्यायलेले नव्हते. यानंतर अभिनेत्री तो घटनाक्रम सांगत म्हणाली, "त्यावेळी माझा ड्रायव्हर एकटाच होता. ते माझ्या घराचे व्हिडीओ काढत होते, म्हणून माझ्या ड्रायव्हरने त्यांचा फोन खाली खेचून ठेवला. ती महिला संतापली आणि म्हणाली, 'तुम्ही मला स्पर्श कसा करू शकता? मी तुमच्याविरुद्ध पोलिसांत बलात्काराची तक्रार दाखल करेन.'मला वाटले की या बिचाऱ्यावर खोटा आरोप लावून त्याला तुरुंगात पाठवले जाईल. म्हणून, एक स्त्री म्हणून मी त्या महिलेशी बोलायला गेले."

खूप वाईट गोष्ट...

"मी बाहेर येताच तिथे जवळपास ३० लोक होते. तेवढ्यात माझ्या ड्रायव्हरने मला गेटच्या आत ओढले आणि मी पोलिसांना फोन केला, पण बिचारा तो बाहेरच राहिला आणि त्यांच्या तावडीत सापडला.त्यातील लोकांनी त्याला मारहाण करायला सुरुवात केली.मी त्याला वर जाऊन मुलांसोबत बसायला सांगितलं. ते लोक माझ्या ड्रायव्हरला जीवे मारण्याची धमकी देत होते, त्याला बाहेर काढा असं ते म्हणू लागले. जर मी त्याला बाहेर सोडलं असतं, तर त्यांनी त्याला खूप मारलं असतं. आम्ही घरात फक्त तीन महिला होतो आणि बाहेर ते ३० लोक होते. ते खूप भीतीदायक होतं. जेव्हा मी पोलिसांना फोन करेन असं म्हणाले, तेव्हा त्यांनी माझा फोनसुद्धा हिसकावून घेतला होता.की आता सेलिब्रिटींना टार्गेट करणं,  ही खूप वाईट गोष्ट आहे. असा खुलासा अभिनेत्रीने यावेळी केला.

Web Title : वायरल लड़ाई और ड्राइवर पर हमले पर रवीना टंडन ने तोड़ी चुप्पी

Web Summary : रवीना टंडन ने अपने ड्राइवर के साथ हुई हाथापाई के वायरल वीडियो पर बात की। उन्होंने वीडियो को एडिट किया हुआ बताया और स्थानीय लोगों पर उत्पीड़न और घर में घुसने की कोशिश करने का आरोप लगाया, जब उनके बच्चे घर पर थे। उन्हें झूठे आरोपों के बीच अपने ड्राइवर की सुरक्षा का डर था।

Web Title : Raveena Tandon Breaks Silence on Viral Fight and Driver Assault

Web Summary : Raveena Tandon addresses the viral video of her driver's altercation. She claims the video was edited and accuses locals of harassment and attempted home intrusion while her children were present. She feared for her driver's safety amidst false accusations.