कंगना राणौतला कसा वाटला रणवीरचा 'धुरंधर'? पोस्ट शेअर करत म्हणाली-"सरकारमध्ये मोदी अन् बॉलिवूडमध्ये..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 10:24 IST2025-12-21T10:22:33+5:302025-12-21T10:24:33+5:30
कसा आहे रणवीरचा 'धुरंधर'? कंगना राणौतची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाली-" या पाकिस्तानी..."

कंगना राणौतला कसा वाटला रणवीरचा 'धुरंधर'? पोस्ट शेअर करत म्हणाली-"सरकारमध्ये मोदी अन् बॉलिवूडमध्ये..."
Kangana Ranaut Praises Dhurandhar Movie: संपूर्ण जगभरात आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर'ची (Dhurandhar Movie ) प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. हा चित्रपट सत्य घटनेपासून प्रेरित आहे आहे. विशेष म्हणजे प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाला सिने-रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.५ डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.या चित्रपटाची गाणी,कथा तसेच कलाकारांच्या अभिनयाचं सर्व स्तरावर कौतुक होत आहे. सर्वसामान्यांसह अनेक सेलिब्रिटीही या कलाकरांची प्रशंसा करताना दिसत आहेत. त्यात आता अभिनेत्री, खासदार कंगना राणौतने या चित्रपटाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे.

'धुरंधर' हा सिनेमा दिवसेंदिवस कमाईचे अनेक विक्रम रचत आहे. दरम्यान, या चित्रपटाने २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत आपलं स्थान पक्क केलं आहे. रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेला धुरंधर अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणौतने आपली प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्रीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर स्टोरी शेअर करत म्हटलंय, "मी धुरंधर चित्रपट पाहिला आणि मला खूप मजा आली. ही उत्कृष्ट कलाकृती पाहून मी प्रेरित झाले आहे. या मागची कला आणि मेहनत प्रेरणा देणारी आहे. पण, सर्वात जास्त कौतुक हे चित्रपटाच्या दिग्दर्शकाचं आहे."
त्यानंतर कंगना रणौतने 'धुरंधर' चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.यासह तिने दिग्दर्शकाची पत्नी यामी गौतमचेही अभिनंदन केले.पुढे तिने लिहिलंय," प्रिय आदित्य धर, सीमेवर आपले संरक्षण दल, सरकारमध्ये आपले मोदीजी आणि बॉलिवूड सिनेमात तुम्ही, या पाकिस्तानी दहशतवाद्यांना अशीच चांगली धुलाई करत राहा. संपूर्ण चित्रपटादरम्यान शिट्ट्या आणि टाळ्या वाजत होत्या. प्रत्येकाचे काम अप्रतिम आहे, पण या चित्रपटाचा खरा धुरंधर हा स्वतः चित्रपट निर्माता आदित्य धर आहे. यामी गौतमचेही अभिनंदन...", अशा आशयाची पोस्ट तिने लिहिली आहे.
दरम्यान, दिग्दर्शक आदित्य धरने कंगना रणौतची ही पोस्ट त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर रि- शेअर केली. त्यासोबतच दिग्दर्शकाने कॅप्शनमध्ये, "खूप खूप धन्यवाद, कंगना जी." म्हणत तिचे आभार मानले आहेत.