Video: बाबो! नग्न अवस्थेत झाडावर चढला 'हा' बॉलिवूड अभिनेता, कारण ऐकून थक्कच व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 13:51 IST2026-01-10T13:46:53+5:302026-01-10T13:51:36+5:30
अंगावर एकही कपडा न घालता विवस्त्र अवस्थेत प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता झाडावर चढला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे

Video: बाबो! नग्न अवस्थेत झाडावर चढला 'हा' बॉलिवूड अभिनेता, कारण ऐकून थक्कच व्हाल
एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. हा अभिनेता अंगावर एकही कपडा परिधान न करता नग्न अवस्थेत झाडावर चढला आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. परंतु अभिनेत्याने यामागचं कारण सांगितल्यावर अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे, बॉलिवूडचा 'ॲक्शन स्टार' विद्युत जामवाल.
विद्युत नेहमीच फिटनेस आणि साहसी कृत्यांच्या बाबतीत नवनवीन प्रयोग करत असतो. सध्या सोशल मीडियावर विद्युतचा एक व्हिडिओ प्रचंड चर्चेत आहे, ज्यामध्ये तो नग्न अवस्थेत एका उंच झाडावर चढताना दिसत आहे. हा व्हिडिओ केवळ प्रसिद्धीसाठी नसून, तो एका विशिष्ट योगसाधनेचा भाग असल्याचे विद्युतने स्पष्ट केले आहे.
काय आहे 'सहज' साधना?
विद्युत जामवाल हा कलरीपायट्टूचा (Kalaripayattu) प्रशिक्षण घेत आहे. त्याने हा व्हिडिओ शेअर करताना सांगितले की, तो वर्षातून एकदा 'सहज' (Sahaja) या योगसाधनेचा सराव करतो. 'सहज' म्हणजे निसर्गाशी पूर्णपणे एकरूप होणे आणि आपल्या शरीरातील नैसर्गिक अंतःप्रेरणेकडे परत येणे. विद्युतच्या मते, जेव्हा आपण कपड्यांशिवाय निसर्गाच्या संपर्कात येतो, तेव्हा शरीरातील 'न्यूरोरिसेप्टर्स' आणि 'प्रोप्रीओसेप्टर्स' अधिक सक्रिय होतात, ज्यामुळे मानसिक एकाग्रता आणि शारीरिक संतुलन सुधारते.
व्हिडिओमध्ये विद्युत एका दाट जंगलात दिसत असून, तो अतिशय कौशल्याने एका मोठ्या झाडावर चढत आहे. त्याच्या हालचालींमधील सहजता पाहून चाहते अवाक झाले आहेत. विद्युतने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "सहज म्हणजे निसर्गाशी पुन्हा जोडले जाणे आणि आपल्यातील आंतरिक शक्तीला जागृत करणे." हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी त्याच्या धाडसाचे आणि फिटनेसचे कौतुक केले आहे, तर काहींनी या प्रयोगाबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. एकूणच चाहत्यांनी विद्युतला ट्रोल न करता त्याच्या या कृतीकडे कुतुहलाने पाहिले आहे.