"जंजीर में जकडा राजा मेरा, अब भी सबपे भारी है...", विकी कौशलने 'छावा'साठी लिहिलेली पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 11:04 IST2025-02-21T10:58:21+5:302025-02-21T11:04:32+5:30
बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या 'छावा' या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे.

"जंजीर में जकडा राजा मेरा, अब भी सबपे भारी है...", विकी कौशलने 'छावा'साठी लिहिलेली पोस्ट चर्चेत
Vicky Kaushal: बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) सध्या 'छावा' या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दरम्यान, या चित्रपटातील विकी कौशलचा अभिनय तसेच छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी 'छावा'साठी घेतलेली मेहनत पाहून सगळेजण भारावून गेल्याचे पाहायला मिळत आहेत. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून मराठीसह बॉलिवूड इंडस्ट्रीतील कलाकार विकी कौशलचं भरभरुन कौतुक करत आहेत. अशातच छावासाठी विकी कौशलने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट पाहून नेटकरी सुद्धा भारावून गेले आहेत.
विकी कौशलने सोशल मीडियावर 'छावा' चित्रपटामधील एक फोटो पोस्ट केला आहे. छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतरच्या त्या सीनचा हा फोटो आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत कॅप्शनमध्ये अभिनेत्याने लिहिलंय की, “हाथी घोड़े तोप तलवारें , फौज तो तेरी सारी है…, पर ज़ंजीर में जकड़ा राजा मेरा , अब भी सबपे भारी है!” अशा आशयाची पोस्ट विकी कौशलने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. अभिनेत्याच्या या पोस्टवर अनेक कलाकारांसह त्यांच्या चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया देत कमेंटच्या माध्यमातून ते व्यक्त झाले आहेत.
दरम्यान, 'छावा' चित्रपटाची क्रेझ जगभरात आहे. या चित्रपटात विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांची मुख्य भूमिका आहे. तर अभिनेता अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. सध्या बॉक्स ऑफिवर हा चित्रपट अनेक रेकॉर्डस मोडत आहे. प्रदर्शनानंतर अवघ्या आठवड्याभरात या सिनेमाने भारतात २०० कोटींपेक्षा जास्त कलेक्शन केलं आहे.