वरुण धवनने 'बॉर्डर-२' सिनेमाच्या शूटिंगला केली सुरुवात; सेटवरील पहिला फोटो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 13:12 IST2025-01-16T13:07:35+5:302025-01-16T13:12:41+5:30

'बॉर्डर-२' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

bollywood actor varun dhawan joins border 2 movie start shooting photo viral on social media  | वरुण धवनने 'बॉर्डर-२' सिनेमाच्या शूटिंगला केली सुरुवात; सेटवरील पहिला फोटो आला समोर

वरुण धवनने 'बॉर्डर-२' सिनेमाच्या शूटिंगला केली सुरुवात; सेटवरील पहिला फोटो आला समोर

Varun Dhawan Border-2 Movie : १९९७ साली प्रदर्शित झालेला 'बॉर्डर' या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित असलेला हा सिनेमा आजही तितकाच लोकप्रिय आहे. जवळपास २७ वर्षानंतर आता या देशभक्तीपर चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'बॉर्डर' मध्ये अभिनेता सनी देओल (Sunny Deol), सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, अक्षय खन्ना अशी तगडी स्टारकास्ट होती. आता 'बॉर्डर-२' मध्ये नवे चेहरे दिसणार आहेत. अगदी काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आता अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) चित्रपटासोबत जोडला गेलाय. अभिनेत्याने 'बॉर्डर-२' च्या शूटिंगला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय. सोशल मीडियावर वरुण धवनचा सेटवरील पहिला फोटो समोर आला आहे. 


नुकतीच 'T-Series'द्वारे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये अभिनेता वरुण धवन, दिग्दर्शक अनुराग सिंग, प्रसिद्ध निर्माते भुषण प्रधान आणि निधी दत्ता दिसत आहे. 'T-Series' च्या सोशल मीडिया अकाउंटवर  "अॅक्शन, धैर्य आणि देशभक्ती...अभिनेता वरुण धवनने 'बॉर्डर-२' च्या शूटिंगला सुरुवात केली आहे...",  असं कॅप्शन देत पोस्ट शेअर करण्यात आली आहे. 

'बॉर्डर-२' येत्या २३ जानेवारी २०२६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन धुरा जेपी दत्ता नाही तर अनुराग सिंह करणार आहेत. शिवाय या चित्रपटामध्ये सनी देओलसह वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी
हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 

Web Title: bollywood actor varun dhawan joins border 2 movie start shooting photo viral on social media 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.