हे दान नाही, तर सन्मान! तुरुंगात शरण गेलेल्या राजपाल यादवच्या मदतीसाठी पुढे आला 'हा' बॉलिवूड अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 13:36 IST2026-02-10T13:32:51+5:302026-02-10T13:36:14+5:30

बॉलिवूडचा प्रसिद्ध विनोदी अभिनेता राजपाल यादव सध्या एका कठीण आर्थिक आणि कायदेशीर संकटात सापडला आहे. चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने दिलासा नाकारल्यानंतर राजपाल यादवला तिहार तुरुंगात शरण जावे लागले.

Bollywood actor sonu sood came forward to help Rajpal Yadav who was in financial trouble | हे दान नाही, तर सन्मान! तुरुंगात शरण गेलेल्या राजपाल यादवच्या मदतीसाठी पुढे आला 'हा' बॉलिवूड अभिनेता

हे दान नाही, तर सन्मान! तुरुंगात शरण गेलेल्या राजपाल यादवच्या मदतीसाठी पुढे आला 'हा' बॉलिवूड अभिनेता

बॉलिवूडचा प्रसिद्ध विनोदी अभिनेता राजपाल यादव सध्या एका कठीण आर्थिक आणि कायदेशीर संकटात सापडला आहे. चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने दिलासा नाकारल्यानंतर राजपाल यादवला तिहार तुरुंगात शरण (Surrender) जावे लागले. या कठीण प्रसंगी जेव्हा राजपाल यादव यांनी "माझ्याकडे आता पैसेही नाहीत आणि सोबत मित्रही नाहीत" अशी हतबलता व्यक्त केली. पण आता राजपालच्या मदतीला सोनू सूद पुढे आला आहे.

सोनू सूदचा मदतीचा हात

राजपाल यादव यांची भावनिक प्रतिक्रिया पाहून सोनू सूदने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एक पोस्ट शेअर केली. सोनू सूदने केवळ राजपालला शाब्दिक पाठिंबा दिला नाही तर आर्थिक मदतीचं आश्वासनही दिलं. सोनू सूदने जाहीर केले की, राजपाल यादव त्याच्या आगामी चित्रपटाचा भाग असतील. चित्रपट अद्याप लिखाणाच्या प्रक्रियेत आहे तरीही सोनूने राजपालला आगाऊ रक्कम (Signing Amount) देण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळेल. 

"ही मदत नसून त्यांचा सन्मान आहे," असे म्हणत सोनूने बॉलिवूडमधील इतर निर्माते आणि दिग्दर्शकांनाही आवाहन केले आहे की, राजपाल यादव यांच्यासारख्या गुणी कलाकाराला या संकटकाळात साथ द्यावी.

सोनूने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, "राजपाल यादव एक अत्यंत प्रतिभावान अभिनेता आहेत ज्यांनी सिनेसृष्टीला अनेक अविस्मरणीय सिनेमे दिले आहेत. कधीकधी वेळ वाईट असते, पण याचा अर्थ असा नाही की, आपण आपल्या सहकाऱ्याला एकटे सोडावे. राजपाल माझ्या चित्रपटात असतील आणि मी त्यांना साइनिंग अमाउंट देत आहे. आपण सर्वजण मिळून त्यांना पुन्हा उभारी देऊ शकतो, कारण आपण केवळ एक इंडस्ट्री नाही तर एक कुटुंब आहोत."

नेमकी घटना काय आहे?

तुरुंगात जाण्यापूर्वी राजपाल यादव अत्यंत भावुक झाला होता. "माझ्याकडे आता देण्यासारखे काहीच उरलेले नाही." असं त्याने म्हटलं होतं. मात्र, सोनू सूदच्या या पुढाकारामुळे राजपाल यादव आणि त्याच्या चाहत्यांना एक आशेचा किरण मिळाला आहे. 

राजपाल यादव यांनी २०१० मध्ये 'अता पता लापता' या चित्रपटासाठी दिल्लीतील एका कंपनीकडून ५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. व्याजासह ही रक्कम आता ९ कोटी रुपयांच्या वर गेली आहे. अनेक वेळा मुदत वाढवूनही थकबाकी न भरल्यामुळे आणि चेक बाऊन्स झाल्यामुळे न्यायालयाने त्यांना ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी राजपाल यादव यांनी तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केले.

Web Title : जेल में सरेंडर के बाद सोनू सूद ने राजपाल यादव की मदद की: यह सम्मान है!

Web Summary : जेल में सरेंडर के बाद वित्तीय संकट का सामना कर रहे राजपाल यादव को सोनू सूद से समर्थन मिला। सूद ने उन्हें अपनी आगामी फिल्म में अग्रिम भुगतान के साथ भूमिका की पेशकश की, इसे सम्मान बताते हुए उद्योग से समर्थन का आग्रह किया।

Web Title : Sonu Sood helps Rajpal Yadav after jail surrender: It's respect!

Web Summary : Rajpal Yadav, facing financial crisis after jail surrender, receives support from Sonu Sood. Sood offers him a role in his upcoming film with advance payment, calling it respect, urging industry support.