'बिग बॉस' फेम अब्दु रोजिकला मिळाली दुल्हनिया! लवकरच चढणार बोहल्यावर; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 11:52 IST2024-05-10T11:50:41+5:302024-05-10T11:52:00+5:30
'दुबई के छोटे भाईजान' म्हणून प्रसिद्ध असलेला अब्दू रोजिक ( Abdu Rozik) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.

'बिग बॉस' फेम अब्दु रोजिकला मिळाली दुल्हनिया! लवकरच चढणार बोहल्यावर; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
'दुबई के छोटे भाईजान' म्हणून प्रसिद्ध असलेला अब्दू रोजिक ( Abdu Rozik) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता देखील अब्दू रोजिक एका महत्त्वाच्या कारणामुळे चर्चेत आला आहे. अब्दू रोजिक लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगली आहे. स्वत:हा अब्दुने ही आनंदाची बातमी त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अब्दुने त्याच्या सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने त्याच्या लग्नाची बातमी दिली आहे.
अब्दु रोजिकला त्याची दुल्हनिया मिळाली आहे. अब्दुने व्हिडीओ शेअर करत होणाऱ्या बायकोसाठी घेतलेली अंगठी चाहत्यांना दाखवली. अब्दुने व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहलं, ''माझ्यावर प्रेम करणारी आणि माझा आदर करणारी व्यक्ती मला मिळेल, असा विचारही मी माझ्या आयु्ष्यात कधीच विचार केला नव्हता. पण, मला प्रेम मिळालं आहे. त्यामुळे 7 जुलै ही तारीख तुम्ही लक्षात ठेवा. मी आता किती आनंदी आहे, हे मी शब्दांत व्यक्त करु शकत नाही'.त्याच्या या व्हिडिओवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केल्याचं पाहायला मिळतंय.
20 वर्षीय अब्दू रोजिक हा 7 जुलै रोजी 19 वर्षीय तरूणीसोबत लग्न करणार आहे. अमीरातमध्येच अब्दुचं लग्न होणार आहे. अब्दु रोजिक 'बिग बॉस 16'मध्ये सहभागी झाला आहे. आजवर अब्दुने आपल्या गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अब्दु रोजिक या यूट्यूब चॅनलवर त्याची गाणी उपलब्ध आहेत. त्याच्या बहुतेक गाण्यांचे बोल त्याच्या आयुष्यात आलेल्या संघर्षांवर आधारित आहेत. सोशल मीडियावरदेखील त्याचा मोठा चाहतावर्ग आहे.