सुशांत आत्महत्ये प्रकरणी रिया चक्रवर्तीने लपवली एवढी मोठी गोष्ट, तिच्या भावाचीही होणार चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 10:25 IST2020-06-29T10:25:29+5:302020-06-29T10:25:50+5:30
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी 27 लोकांचा जबाब नोंदविला आहे. या दरम्यान रिया चक्रवर्तीने खूप मोठी गोष्ट लपविल्याचे समोर आले आहे.

सुशांत आत्महत्ये प्रकरणी रिया चक्रवर्तीने लपवली एवढी मोठी गोष्ट, तिच्या भावाचीही होणार चौकशी
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला 14 दिवस उलटले आहेत. तरीदेखील अद्याप या प्रकरणाचा छडा लागलेला नाही. याउलट हे प्रकरण आणखी गुंतत चाललं आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस त्याच्या कुटुंबाला दुसऱ्या राउंडच्या चौकशीसाठी बोलवणार आहेत. तर सुशांतची गर्लफ्रेंज रिया चक्रवर्तीचा भाऊ शॉविकला चौकशीसाठी बोलवले आहे. शॉविक आणि रिया सुशांतच्या कंपनीचे भागीदार होते.
सुशांत सिंग राजपूतची विविडरेज रिएलिटिक्स नामक एक आर्टिफिशिएल इंटेलिजेन्स फर्म होते. या फर्ममध्ये सुशांतने पैसे गुंतवले होते. तर रिया व तिचा भाऊ शॉविक या फर्ममध्ये त्याचे पार्टनर्स होते. रियाने या कंपनीचा चौकशीत उल्लेख केला नव्हता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रियानेच या कंपनीत तिचा भाऊ शॉविकला पार्टनर बनवण्यासाठी सुशांतला मनविले होते. पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखी यांनी सांगितले की, या प्रकरणात आतापर्यंत 27 लोकांचा जबाब नोंदविला आहे.
त्यांनी लोकांना विनंती करत सांगितले होते की पोलिसांवर विश्वास ठेवा, पोलीस आपले काम करत आहे. सुशांतच्या मृत्यूवर प्रत्येक बाजूने चौकशी केली जात आहे. या प्रकरणाची आत्महत्या म्हणून नोंद करण्यात आली आहे पण सुशांतच्या खोलीत कोणतीही सुसाइड नोट सापडली नव्हती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिया व सुशांत यावर्षी नोव्हेंबरमध्ये लग्न करणार होते. सुशांतच्या घरातल्यांना रिया आवडत नव्हती. सुशांतच्या निधनानंतर वडिलांनी सांगितले की, त्यांना अंकिता लोखंडे व क्रिती सनॉन भेटले. पण त्यांनी रियाचा उल्लेख केला नाही.
एकीकडे सुशांत व रियाच्या लग्नाचे वृत्त व्हायरल होत आहे तर दुसरीकडे त्या दोघांचे ब्रेकअप झाले होते असेदेखील बोलले जात आहे. रियाने आपल्या जबाबात सांगितले की, 6 जूनला त्यांच्यात भांडण झाल्यानंतर ती सुशांतचे घर सोडून निघून गेली होती.