दिग्दर्शक म्हणून रितेश देशमुख सेटवर कसा वागतो? भाग्यश्रीने थेट शब्दातच सांगून टाकलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 12:22 IST2026-05-16T12:22:16+5:302026-05-16T12:22:31+5:30

रितेश देशमुखच्या एका फोनवर भाग्यश्रीने पटकथा न ऐकताच 'राजा शिवाजी'साठी दिला होता होकार

Bhagyashree Jijabai In Riteish Deshmukh Raja Shivaji Reveals His Direction Style Film Set Behavior | दिग्दर्शक म्हणून रितेश देशमुख सेटवर कसा वागतो? भाग्यश्रीने थेट शब्दातच सांगून टाकलं

दिग्दर्शक म्हणून रितेश देशमुख सेटवर कसा वागतो? भाग्यश्रीने थेट शब्दातच सांगून टाकलं

रितेश देशमुखचं दिग्दर्शन असलेला 'राजा शिवाजी' सिनेमा १ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. या सिनेमातून पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास मोठ्या पडद्यावर पाहायला मिळला. या चित्रपटात अभिनेत्री भाग्यश्रीनं राजमाता जिजाऊंची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे व अभिनयाचे अनेकांनी कौतुक केले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भाग्यश्रीने रितेशच्या दिग्दर्शन शैलीचे कौतुक करत, तिला हा चित्रपट कसा मिळाला याचा एक रंजक किस्सा शेअर केला आहे.

रितेश देशमुख एक दिग्दर्शक म्हणून कसा आहे? यावर बोलताना भाग्यश्रीने त्याच्या संयमी स्वभावाचे तोंडभरून कौतुक केले. ती म्हणाली, "रितेशचा शांत स्वभाव त्याला एक उत्तम दिग्दर्शक बनवतो. सेटवर कधीकधी गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नसतात, तरीही तो सर्व परिस्थिती अत्यंत शांतपणे हाताळतो".


तुम्हाला हा चित्रपट कसा मिळाला? या प्रश्नाचे उत्तर देताना भाग्यश्री म्हणाली, "रितेशने मला अचानक फोन केला आणि म्हणाला की त्याला मला एका विषयाची कथा ऐकवायची आहे. हा चित्रपट शिवरायांवर आधारित असून मी जिजाबाईंची भूमिका करावी, अशी त्याची इच्छा होती".

विशेष म्हणजे, रितेशचा हा प्रस्ताव ऐकताच भाग्यश्रीने चित्रपटाची संपूर्ण पटकथा (Script) ऐकण्यापूर्वीच या भूमिकेला होकार दिला. हा क्षण तिच्यासाठी खूप भावनिक होता. ती पुढे म्हणाली, "रितेशच्या या फोनने मला अनेक वर्षांपूर्वीच्या त्या दिवसांची आठवण करून दिली, जेव्हा दिग्दर्शक सूरज बडजात्या मला 'मैने प्यार किया'ची कथा सांगायला आले होते".

 

Web Title : भाग्यश्री ने बताया कि रितेश देशमुख निर्देशक के रूप में सेट पर कैसा व्यवहार करते हैं।

Web Summary : 'राजा शिवाजी' के सेट पर भाग्यश्री ने रितेश देशमुख की शांत निर्देशन शैली की प्रशंसा की। उन्होंने बताया कि कैसे रितेश ने उन्हें राजमाता जिजाऊ की भूमिका की पेशकश करने के लिए फोन किया था, स्क्रिप्ट सुनने से पहले ही स्वीकार कर लिया, जिससे उन्हें 'मैंने प्यार किया' की पेशकश याद आ गई।

Web Title : Bhagyashree reveals how Riteish Deshmukh behaves as director on set.

Web Summary : Bhagyashree praised Riteish Deshmukh's calm directorial style on the 'Raja Shivaji' set. She recounted receiving a call from Riteish offering her the role of Rajmata Jijau, accepting before even hearing the script, reminded her of her 'Maine Pyar Kiya' offer.