"गोव्यात महाराष्ट्राबाबत द्वेष वाढत चाललाय...", आयशा टाकियाने पतीची बाजू घेत लिहिली पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 10:52 IST2025-03-05T10:51:37+5:302025-03-05T10:52:15+5:30
आयशा टाकियाच्या पती आणि मुलासोबत गोव्यात नक्की काय घडलं?

"गोव्यात महाराष्ट्राबाबत द्वेष वाढत चाललाय...", आयशा टाकियाने पतीची बाजू घेत लिहिली पोस्ट
बॉलिवूड अभिनेत्री आयशा टाकियाचा (Ayesha Takia) नवरा फरहान आजमी (Farhan Azmi) अडचणीत सापडला आहे. समाजवादी पार्टीचे नेते अबू आजमी यांचा तो मुलगा आहे. गोव्यात स्थानिकांशी वाद घालण्यावरुन आणि शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याला ताब्यात घेण्यात आले. सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास फरहान आजमी कँडोलिम उत्तर गोव्यातील सुपरमार्केटजवळून त्याच्या मर्सिडीज एसयूव्हीमधून जात होता. इंडिकेटर न देता गाडी वळवल्यानंतर स्थानिकांनी त्याला टोकलं. त्याचा स्थानिकांसोबत वाद झाला. त्याने आपल्याजवळ बंदूक असल्याची धमकी दिली. यामुळे कलंगुट पोलिसांनी फरहान आजमीवर गुन्हा दाखल केला. आता या सर्व प्रकरणावर आयशा टाकियाने मौन सोडत पतीची बाजू घेतली आहे.
आयशा टाकियाने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहिले, "आमच्यासाठी ती रात्र खूपच भयावह होती. माझ्या पतीविरोधातील बातम्या पाहून आता मला हे सांगणं खूप गरजेचं वाटतं. यापुढे मी आणखीही माहिती देईनच. माझ्या पतीला आणि मुलाला स्थानिकांकडू वाईट भाषेत धमकावण्यात आलं. त्यांना साहजिकच आपल्या जीवाची काळजी होती. कित्येक तास स्थानिक गुंड त्यांना धमकावत होते, त्यांना घेराव घातला होता. माझ्या पतीने फोन करुन पोलिसांना बोलवलं तर त्यांनी पोलिसांनाही त्रास दिला. गोव्यात महाराष्ट्राविरोधात मोठा द्वेष निर्माण झाला आहे. महाराष्ट्रीय आहे आणि मोठी गाडी आहे हे पाहून त्यांनी सतत फरहान आणि माझ्या मुलाला डिवचलं, शिव्या दिल्या."
"१५० लोकांचा जमाव त्रास देत असल्याचं पाहून फरहानने १०० नंबर लावून पोलिसांना बोलवलं होतं. तर पोलिसांनी उलट फरहानविरोधातच तक्रार दाखल केली. आमच्याकडे याचा व्हिडिओ पुरावा आहे. सीसीटीव्ही फुटेज आहेत जे आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना लवकरच देऊ. आम्ही कायदा अधिकाऱ्यांचं पालन करत आहोत आणि कायद्यावर, भारतीय न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे."