अर्जुन कपूरने खरेदी केला ‘स्काय व्हिला’, किंमत ऐकून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 11:35 AM2021-05-27T11:35:10+5:302021-05-27T11:35:34+5:30

Arjun Kapoor : येथून मुंबईचा सुंदर नजारा दिसतो. या व्हिलाची खास बात म्हणजे येथे एक मिनी गोल्फ एरियाही आहे. 

arjun kapoor bought skyvilla in bandra west and price is 20 crores | अर्जुन कपूरने खरेदी केला ‘स्काय व्हिला’, किंमत ऐकून थक्क व्हाल

अर्जुन कपूरने खरेदी केला ‘स्काय व्हिला’, किंमत ऐकून थक्क व्हाल

googlenewsNext
ठळक मुद्देअर्जुन कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, नुकताच त्याचा ‘सरदार का ग्रँडसन’ हा सिनेमा रिलीज झाला. 

‘इश्कजादे’ म्हणून बॉलिवूड डेब्यू करणारा अर्जुन कपूर (Arjun Kapoor) रिअल लाईफमध्येही कुठल्या ‘इश्कजादे’पेक्षा कमी नाही. फार कमी वेळात अर्जुनने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. आपल्या छोट्याशा करिअरमध्ये त्याने अनेक हिट सिनेमे दिलेत. आता अर्जुनने मुंबईच्या वांद्रे इस्ट भागात एक अलिशान स्काय व्हिला खरेदी केला आहे.
अर्जुनने ज्या बिल्डिंगमध्ये हे अलिशान घर घेतले, ती बिल्डींग 25 मजली आहे. यात 81 स्काय व्हिला आहेत. (Arjun Kapoor bought skyvilla in bandra west )

हा स्कायव्हिला ‘81ऑरिएट’ नावाच्या बिल्डींगमध्ये आहे. हा एक इंटरनॅशनली डिझाईन्ड टॉवर आहे. येथून मुंबईचा सुंदर नजारा दिसतो. या व्हिलाची खास बात म्हणजे येथे एक मिनी गोल्फ एरियाही आहे. 4212 स्क्वेअर फूटच्या या स्काय व्हिलातून थेट समुद्र दिसतो. सी-लिंकचा सुंदर नजाराही दिसतो. अर्जुनने खरेदी केलेल्या या व्हिलाची किंमत किती असावी? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर याची किंमत 20 कोटी असल्याचे कळतेय.

अर्जुन कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, नुकताच त्याचा ‘सरदार का ग्रँडसन’ हा सिनेमा रिलीज झाला. लवकरच तो ‘भूत पुलिस’ या सिनेमात दिसणार आहे. यात सैफ अली खान, जॅकलिन फर्नांडिस, यामी गौतम असे अनेक स्टार आहेत. याशिवाय मोहित सूरी दिग्दर्शित ‘एक विलेन 2’ या चित्रपटातही अर्जुनची वर्णी लागली आहे.

Web Title: arjun kapoor bought skyvilla in bandra west and price is 20 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.