बॉलिवूड अभिनेता अपारशक्ती झाला बाबा, सोशल मीडियावर शेअर केली गुडन्यूज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 04:55 PM2021-08-27T16:55:28+5:302021-08-27T16:56:01+5:30

होय, अपारशक्ती बाबा झाला आहे. बाळाच्या नावाचाही खुलासा झाला आहे.

Aparshakti Khurana And Wife Aakriti Ahuja Blessed With A Baby Girl | बॉलिवूड अभिनेता अपारशक्ती झाला बाबा, सोशल मीडियावर शेअर केली गुडन्यूज

बॉलिवूड अभिनेता अपारशक्ती झाला बाबा, सोशल मीडियावर शेअर केली गुडन्यूज

googlenewsNext
ठळक मुद्देभाऊ आयुष्मानसारखा अपारशक्ती देखील बहुगुणी अभिनेता आहे. तो केवळ अभिनयच नाही तर एक गायक देखील आहे.

बॉलिवूड अभिनेता अपारशक्ती खुराणा (Aparshakti Khurana) बाबा झाला आहे. होय,अपारशक्तीची पत्नी आकृतीने नुकताच एका गोंडस कन्येला जन्म दिला. अपारशक्तीने स्वत: ही गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. शिवाय मुलीच्या नावाचा खुलासाही केला.
अपारशक्तीने आज इन्स्टाग्रामवर एक कार्ड शेअर केले. ‘अपारशक्ती व आकृती 27 ऑगस्ट 2021 रोजी ‘अरजोई ए. खुराणा’चे प्रेमाने स्वागत करत आहेत...,’ असे या कार्डवर लिहिले आहे. (Aparshakti Khurana And Wife Aakriti Ahuja Blessed With A Baby Girl)

अपारशक्तीच्या या पोस्टनंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. भूमी पेडणेकर, नुसरत भरूचा आदींनी त्याला व त्याच्या पत्नीला शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे.
याआधी अपारशक्तीने पत्नी आकृतीच्या मॅटर्निटी फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.  
अपारशक्ती आणि आकृती यांची भेट चंडीगडमध्ये झाली होती. दोघेही आधी एकमेकांचे चांगले मित्र बनले आणि मग एकमेकांच्या प्रेमात पडले. 2014 मध्ये अपारशक्तीने आकृतीशी लग्न केले.

भाऊ आयुष्मानसारखा अपारशक्ती देखील बहुगुणी अभिनेता आहे. तो केवळ अभिनयच नाही तर एक गायक देखील आहे.  अभिनेता अपारशक्तीने आपल्या करिअरची सुरूवात आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटातून केली होती. या चित्रपटात अपारशक्तीची एक सहायक अभिनेत्याची भूमिका होती. यानंतर  बद्रीनाथ की दुल्हनिया,  स्त्री, लुका छुपी अशा अनेक चित्रपटांत तो दिसला. लवकरच तो ‘हेल्मेट’ या सिनेमात दिसणार आहे. सोलो लीड म्हणून त्याचा हा पहिला सिनेमा आहे. या थ्रिलर कॉमेडी चित्रपटात अपारशक्ती खुराना, प्रनूतन बहल आणिअभिषेक बॅनर्जी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या 3 सप्टेंबरला झी फाईव्हवर हा सिनेमा प्रदर्शित होतोय. कंडोम हा विषय अतिशय मनोरंजक पद्धतीने या सिनेमात मांडण्यात आला आहे.  

Web Title: Aparshakti Khurana And Wife Aakriti Ahuja Blessed With A Baby Girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.